ad headr

Powered by Blogger.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची अंत्ययात्रा काढून केला भाजपने निषेध


जळगाव 15 [ प्रतिनिधी]  छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना ,हिंदू विरोधी टिपू सुलतान यांच्याशी करून तमाम हिंदू प्रेमी व राष्ट्रीय प्रेमी बांधवांचा अपमान काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला असून याच्या निषेधार्थ आज दिनांक 15 फेब्रुवारी रविवार रोजी दुपारी चार वाजता भाजपा जुने वसंत स्मृती कार्यालय इथून हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिकृती अंतयात्रा तिरडी काढून सुरुवात करण्यात आली याप्रसंगी तिरडीवर हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुतळा ठेवून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली या तिरडी चे आग्या म्हणून महेश चौधरी हे झाले होते तिरर्डीला आ सुरेश भोळे राजू मामा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ राधेश्याम चौधरीमहापौर दिपमाला काळे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे , राजेंद्र मराठे ,आनंद सपकाळे, मनोज भांडारकर, मुकुंद मेटकर, चंदु महाले, अजित राणे, निलु आबा तायडे, विनोद मराठे, प्रकाश पंडित, यांनी खांदा दिला तसेच टावर चौकात ज्यावेळेस
 प्रतिकात्मक अंत्ययात्रा आल्यानंतर या ठिकाणी मंगलाताई बारी व महिला कार्यकर्त्यांनी रडून काँग्रेसचा निषेध केला या अंत्ययात्रे प्रसंगी भाजपचे सर्व नगरसेवक जिल्हा पदाधिकारी युवा मोर्चा महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments