ad headr

Powered by Blogger.

भडगावात संतसेवालाल महाराज जयंती उत्साहात. नियोजन समिती अध्यक्ष मोरशिंग राठोड यांचा ‘गोरबंजारा रत्न’ पुरस्काराने गौरव


भडगाव 15  (प्रतिनिधी):.  सुभाष ठाकरे
क्रांतीकारक संत सेवालाल महाराज यांची २८७ वी जयंती शहरात १५ फेब्रुवारी रोजी भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने शहरातील वातावरण ‘जय सेवालाल’च्या जयघोषाने दुमदुमून गेले.
 आझाद चौक, नगरपरिषद कार्यालयापासून भवानी बाग मैदानापर्यंत संत सेवालाल महाराजांची मिरवणूक काढण्यात आली. विविध ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या समाजबांधवांनी सोहळ्याला रंगत आणली. भवानी बाग मैदान येथे प्रतिमा पूजन करून महाआरती करण्यात आली.
या कार्यक्रमात नियोजन समितीचे अध्यक्ष मोरशिंग दलू राठोड यांना प्राप्त झालेल्या ‘राष्ट्रसंत रामराव महाराज गोरबंजारा रत्न पुरस्कार' बद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आलेल्या राठोड यांच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली. यावेळी व्याख्याते प्रदीप देसले यांनी समाजबांधवांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
सोहळ्याला मेहताबसिंग नाईक अध्यक्षस्थानी होते. नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष यांचे पती जहांगीर मालचे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिवसेना युवा नेते सुमित पाटील, नगरसेवक लखिचंद पाटील, युवराज पाटील, विजयकुमार भोसले, सचिन चोरडिया, अतुलसिंग परदेशी, अलीम शहा, आबा चौधरी, डॉ. बी. बी. भोसले, निलेश महाले, यशकुमार पाटील, अशोक परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
गोर बंजारा समाजातील योगेश पवार, सुभाष राठोड, जोहारलाल चव्हाण, जगदीश पवार,पुरनदास पवार, प्रकाश चव्हाण,मोरसिंग राठोड, जोहरसिंग जाधव, किसन पवार, विकास जाधव, सुभाष महाराज, हरी राठोड, नाना पवार, सकरु बल्लु, नथ्थू राठोड, यांच्यासह महिला-पुरुष व तरुण वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची प्रस्तावना मनीष राठोड सर यांनी केली. सूत्रसंचालन नाना वाघ यांनी तर आभार प्रदर्शन योगेश जाधव यांनी मानले

No comments