ad headr

Powered by Blogger.

भडगावात पावसाचा रुद्रावतार प्रशासनाकडून रेड अलर्ट संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत


 भडगाव –  [ प्रतिनिधी ].. सुभाष ठाकरे... तालुक्यात रात्रभर सुरू असलेल्या संततधार  पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असल्यामुळे  प्रशासनाने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शहरातून वाहणारा कोल्हा नाल्याचे पाणी  शहरात घुसले असून  सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे 
रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील लहान-मोठे नदी-नाले पूर्ण क्षमतेने भरून वाहत असल्यामुळे परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे प्रशासनाने अत्यावश्यक काम वगळता घराबाहेर न पडण्याचा  इशारा दिला आहे. तसेच, नागरिकांना आपले पशुधन सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आणि नदी-नाल्यांच्या काठावर पाणी पाहण्यासाठी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारचे नुकसान, धोकादायक स्थिती किंवा दुर्घटना घडल्यास तात्काळ प्रशासनाला कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून, नागरिकांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. ‘सुरक्षितता प्रथम’ या संदेशासह प्रशासनाने नागरिकांना घरातच सुरक्षित राहण्याचे आणि प्रशासनाकडून येणाऱ्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे

No comments