मू. जे. च्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागात 'आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीव दिन' उत्साहात साजरा
जळगाव: [ प्रतिनिधी ]...मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त), जळगाव येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागात 'आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीव दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवात मायक्रोबायॉलॉजिस्ट सोसायटी, इंडियाच्या संयुक्त विद्यमाने विभागात दोन दिवशीय 'मायक्रोबायो फेस्ट- २०२५' अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सया उत्सवात मुख्यत्वे जैविक खते व कीटकनाशके, सूक्ष्मजीवशास्त्र व वातावरण बदल, सूक्ष्मजीवांचा पोषणचक्रातील सहभाग, रुग्णालयातील होणारे संसर्ग, मानवी कल्याणासाठी सूक्ष्मजीवशास्त्र, पिके व सूक्ष्मजीव आंतरक्रिया, कोविड-१९ चे जागतिक परिणाम, लस विकासातील अद्ययावत तंत्रज्ञान, बायोप्लास्टिक या विषयांवर पोस्टर प्रदर्शन, मॉडेल प्रदर्शन, पॉट पेंटिंग, प्रश्नमंजुषा स्पर्धा, निबंध लेखन व मायक्रोबायोम फूड फेस्टिवल याचा समावेश होता. कार्यक्राचे उदघाटन महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे उप-प्राचार्य डॉ.मनोज चोपडा यांचे हस्ते झाले.
उदघाटनाप्रसंगी डॉ. चोपडा यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. उद्घाटनाच्या वेळी कार्यक्रम समन्वयक प्रा. श्रेया पांडे, विभागप्रमुख प्रा.डॉ.केतन नारखेडे, परीक्षा नियंत्रक डॉ. लीना ढाके, डॉ. संगीत चंद्रात्रे, डॉ. नयना पाटील, प्रा. प्रसाद निकुमे , मायक्रोबायॉलॉजिस्ट सोसायटी, इंडियाचे उत्तर महाराष्ट क्षेत्रीय समन्वयक प्रा. राजेश सगळगिळे, श्री. महेश पाटील व इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विविध स्पर्धा मध्ये ऐंशीहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. पोस्टर प्रदर्शन व मॉडेल प्रदर्शन या स्पर्धेचे परीक्षण डॉ. ओंकार साळुंके यांनी केले. तर पॉट पेंटिंग स्पर्धेसाठी डॉ.नम्रता महाजन व प्रा.देवेश्री सोनावणे परीक्षक म्हणून लाभले. दिवसाच्या प्रथम सत्रात ह्या तीनही स्पर्धा पार पडल्या. दिवसाच्या उत्तरार्धात निबंध लेखन व प्रश्नमंजुषा ह्या स्पर्धा संपन्न झाल्या.
निबंध स्पर्धेचे परीक्षण प्रा. प्रसाद निकुमे तर प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी डॉ.नयना पाटील व डॉ. अंजली जाधव यांनी परीक्षणाचे काम केले. पोस्टर प्रदर्शन स्पर्धेत पूजा माळी प्रथम, तज्ञा बाविस्कर द्वितीय तर दिव्या साळुंके व हुमेश्वरी पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला. मॉडेल प्रदर्शन मेघा इंगळे व दीप्ती पाटील यांनी बाजी मारली. पॉट पेंटिंग स्पर्धेत गायत्री मोरे यांना पहिल्या, गौरी चौधरी यांना दुसऱ्या व ज्ञानदा दाभाडे यांना तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. निबंध स्पर्धेला विशेष प्रतिसाद मिळाला . या स्पर्धेत दीप्ती सोनार प्रथम, भूमिका बनसोडे द्वितीय तर नेहा झा तृतीय क्रमांकावर विजयी ठरल्या. प्रश्नमंजुषा स्पर्धेत अथेना सानयाल व तेजस्विनी कानडे यांच्या संघाने प्रथम तर सारस पाटील व राजेश पाटील यांनी उपविजेता संघाचे स्थान मिळवले. या पाच स्पर्धा पहिल्या दिवशी सापांना झाल्यात. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी फरमेंटेड फूड या थीमवर मायक्रोबायोम फूड फेस्टिवल संपन्न झाले. सदर फूड फेस्टिव्हलचे उदघाटन विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. भूषण कविमंडन यांनी केले. ह्या स्पर्धेत गुणजन मौर्य, गौरी सोळंकी व अनन्या गुरव यांच्या गटाला प्रथम, दक्षता चौधरी, गौरी चौधरी, श्रुती पाटील व कविता पाटील यांच्या गटाला द्वितीय तर ज्ञानदा दाभाडे यांना तृतीय पारितोषिक मिळाले. उत्सवाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, जळगाव येथील फॉरेन्सिक औषधी विभागप्रमुख, डॉ. अगतराव शिवाजी औघडे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. विद्यार्थ्यांनी अध्यात्म, ज्ञान व विज्ञानाची सांगड घालून आपली प्रगती करावी असे प्रतिपादन केले. यावेळी ज्ञानेश्वरीतील दृष्टांत डॉ. औघडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले व विद्यार्थ्यांना शुभेच्या दिल्यात. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान के.सी. ई. सोसायटीच्या शैक्षणिक संचालिका, तथा सेवानिवृत्त कुलगुरू प्रा. डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी भूषविले. सदर उत्सवासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. सं .ना. भारंबे व मायक्रोबायॉलॉजिस्ट सोसायटी, इंडियाचे अध्यक्ष प्रा.डॉ. ए. एम. देशमुख यांनी शुभेच्या दिल्या.
Post a Comment