अमळनेर नगरीचा चेहरा मोहरा बदलणार.अलकाताई पवार नगराध्यक्षा होणार..🔴
अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमळनेर महिला शहराध्यक्ष तथा दुर्गा फाउंडेशन अमळनेर संचलित व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल चे सचिव सौ अलकाताई उत्कर्ष पवार यांनी नगरपालिका नगराध्यक्ष निवडणूक लढवावी यासाठी अमळनेर शहरातील अनेक नागरिकांनी त्यांना विनंती केली आहे. सुशिक्षित ,सुशील ,सर्वगुणसंपन्न सामाजिक कार्याची जाण असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय महिला शहराध्यक्ष यांचा नावलौकिक तसेच नागरिकांचा प्रतिसाद पाहता अत्यंत चांगला नगराध्यक्ष अमळनेर नगरीला मिळणार आहेत. अनुसूचित जमाती आरक्षित जागेवर नगराध्यक्ष म्हणून कमालीचे कल्पकता असलेले, विकासाची जाण असलेल्या सौ आलका ताई उत्कर्ष पवार या एकमेव नगराध्यक्ष पदाला न्याय देणाऱ्या ठरतील आसा नागरिकांना ठाम विश्वास आहे. अमळनेर नगरीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी तसेच विकासाचा कोरम भरून काढण्यासाठी सदैव तत्पर राहील अशी प्रतिक्रिया अलकाताई पवार यांनी दिली. अमळनेर शहरातील महिलांमध्ये प्रख्यात असलेले. धडाडीच्या महिला शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून नावलौकिक मिळवला आहे. आडल्या-नडल्यांची कामे चुटकीसरशी सोडवण्यात पारंगत असलेल्या धडाडीच्या अलकाताई पवार यांचा विजय निश्चित मानला जातो आहे. अमळनेर शहरातील प्रतिष्ठित तसेच सर्व सामान्य नागरिकांमध्ये मिसळणारे स्वतःची ओळख निर्माण करणारे सामाजिक कार्यकर्ते उत्कर्ष वामनराव पवार चेअरमन दुर्गा फाउंडेशन अमळनेर यांच्या त्या पत्नी आहेत. उत्कर्ष पवार यांचा लोकसंग्रह आणि त्यांची जनमानसातली स्वच्छ प्रतिमा याचा उपयोग व फायदा अलकाताई पवार यांच्या उमेदवारीला होणार आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकी संदर्भात हजारो नागरिकांचा शुभेच्छा व सदिच्छा चा वर्षाव सुरू आहे.
Post a Comment