अमळनेर येथील भूमिपुत्र आमदार यांना मंत्रिमंडळात स्थान द्या.. शहराध्यक्ष मुक्तार खाटीक यांची निवेदनाद्वारे मागणी.
अमळनेर (प्रतिनिधी)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्या सेलचे राज्य प्रमुख एडवोकेट नाजीर काजी यांच्या जळगाव येथील आढावा बैठकीत अमळनेर शहराध्यक्ष मुक्तार दादा खाटीक तसेच जळगाव जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खाटीक व त्यांच्या कार्यकारणीने निवेदन दिले.
अमळनेर तालुक्याचे आमदार तथा माजी मंत्री अनिल दादा पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. मुक्तार दादा यांनी ही मागणी जोरात लावून धरली तुमच्या भावना आम्ही पक्ष श्रेष्ठींना कळवतो असे आश्वासन देऊन निवेदन स्वीकारले .
Post a Comment