छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू अंगरक्षक जिवाजी महाले यांची जयंती श्री संत सेना महाराज नाभिक समाज विकास मंडळाच्या वतीने श्री अशोक सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली भडगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
भडगाव 10/10.[ प्रतिनिधी].. सुभाष ठाकरे
समाज मंदिरात आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू अंगरक्षक जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पुजन अध्यक्ष संजय पवार, अँड भरत ठाकरे, अशोक सोनवणे सह सर्व उपस्थित समाज बांधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष संजय पवार यांनी जिवाजी महाले यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी झालेली भेट, सैन्यातील सहभाग, जिवाजी महाले यांची स्वामीनिष्ठा ते प्रतापगडा वरील शिवाजी महाराज व जिवाजी महाले यांचे अद्वितीय शौर्य याबाबत सविस्तर माहिती आपल्या मनोगतातून दिली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष संजय पवार (पत्रकार), उपाध्यक्ष रविंद्र शिरसाठ, सचिव अँड. भरत ठाकरे, कार्यकारणी सदस्य सुभाष ठाकरे, नामदेव चव्हाण, दिलीप शिरसाठ, कीशोर निकम, राकेश शिरसाठ, अशोक सोनवणे, गणेश शिरसाठ, श्रावण वाघ हरसवाडीकर, संदीप वाघ, श्री सोनवणे (ब्राम्हणे ) व समाज बांधव उपस्थित होते. यावेळी पत्रकार नरेन्द्र पाटील याची विशेष उपस्थिती होती.
Post a Comment