🔴🔴 अमळनेर तालुक्यातील आम सभा कधी भरणार?तालुक्यातील जनतेचाप्रश्न 🔴🔴
अमळनेर( प्रतिनिधी ) तालुका पंचायत समिती कडून आयोजित करण्यात येणारी ग्रामीण व शहरी जनतेच्या प्रश्नांना जागेवर वाचा फोडण्यासाठी घेण्यात येणारी आमसभा अनेक वर्षापासून झालेली नाही. तालुक्यातील व शहरातील अनेक समस्या प्रलंबित असून त्याच्यावर" ब्र" शब्द काढायला सुद्धा प्रशासकीय अधिकारी, प्रशासक ,व जबाबदार अधिकारी तयार दिसत नाहीत.शहरात आणि तालुक्यात अनेक वर्षापासून अनेक समस्या "आ" वासून उभ्या असून सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या तसेच गंभीर मूलभूत समस्यांशी काही एक घेणे देणे नाही असा एकंदरीत सूर निघताना दिसत आहे. माजी मंत्री तथा भूमिपुत्र आमदार यांच्या अध्यक्षतेखाली भरवली जाणारी आमसभा त्यांच्या कार्यकाळात तरी दिसली नाही.
नेमके यामागील गौड बंगाल काय आहे याबद्दल जनता अनेक प्रश्न मनात साठवून बसली आहे. महाराष्ट्रभर गाजत असलेल्या आमसभा पाहून अंमळनेर शहरांमध्ये सुद्धा सभा व्हावी व तालुक्यातील अनेक गंभीर प्रश्न मार्गी लावावेत अशी अपेक्षा जनता करते आहे .किंबहुना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र मार्ग परिवहन, महाराष्ट्र वीज वितरण, नगरपालिका प्रशासन, तालुका पंचायत समिती, ग्रामपंचायत च्या समस्या, सार्वजनिक बांधकाम विभाग याअंतर्गत येणाऱ्या समस्या, तहसील कार्यालया संबंधित अनेक समस्या जसे की रेती ,रेशन अन्नसुरक्षा योजना अंत्योदय योजना याअंतर्गत वंचित लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासंदर्भातील तसेच अपात्र लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अन्नसुरक्षा लाभाच्या योजनांचा निपटारा करणे बाबत, सहाय्यक डॉ दुय्यम निबंधक कार्यालय संबंधित समस्या, प्रांताधिकारी च्या प्रशासकीय कार्यकाळातील व तत्सम गंभीर समस्या जशी की शस्त्र परवाना नूतनीकरण, ज्यांच्याकडे शस्त्र परवाना नाही अशा कायद्याला धोका निर्माण करणाऱ्या व समाजाचे स्वास्थ्य बिघडवणाऱ्या अनधिकृत बंदूक ,पिस्तोल शस्त्रसाठा बाळगणाऱ्या दहशत पसरविणाऱ्या नागरिकांवर टाच बसविणे संदर्भातील समस्या, धार्मिक मिरवणुकीं वरील होणाऱ्या दगडफेकीच्या नित्याच्या झालेल्या घटना यांच्यावर प्रकाशझोत संदर्भात, तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचार,अमळनेर ते मुडी व्हाया नंदगाव मार्ग रहदारी योग्य करणे संदर्भात. तालुक्यातील मटका, जुगार, सोरट सारखे आत्महत्येस प्रवृत्त करणारी व्यवसाय यांना आलेला ऊत. यांच्यावर पोलीस प्रशासनाचा नसलेला अंकुश, तालुक्यातील होणाऱ्या विविध ठिकाणी विकास कामांमधील भ्रष्टाचार व निकृष्ट ते बाबत आवाज उठवणे किंवा तशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाका संदर्भात हजारो समस्या तालुक्यात आणि शहरात उभे आहेत संबंधित आम सभा घेणारे जबाबदार अधिकारी यांनी अति तातडीने व जलद गतीने लवकरात लवकर आम सभा घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Post a Comment