🔴 बोरी नदी अखेर दुथडी भरून वाहिली. काठा वरील बळीराजाची प्रतीक्षा संपली..
अमळनेर (प्रतिनिधी) पावसाळा सुरू झाल्यापासून एकही दमदार पाऊस नसल्यामुळे बोरी नदीला पूर आला नव्हता.बोरी नदी काठावरील शेतकऱ्यांसाठी नदी ही जीवनदायिनी आहे पाण्याच्या झिरप्या मुळे पर्क्युलेशन मुळे पाणी वर्षभरा साठी शेती सिंचनाच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटतो. सर्व दूर महाराष्ट्र भर पाऊस पडत होता, नद्या नाले भरभरून वाहत होते, परंतु बोरी नदी कोरडी ठाक पडली होती. शेतकरी चिंताग्रस्त होते. परंतु पुरामुळे बळी राजा सुखावला आहे. नदीपात्रांमध्ये अत्यंत घाणीचे साम्राज्य होते. त्यामुळे नदी पार करताना अत्यंत दुर्गंधीला सामोरे जावे लागत होते. संपूर्ण अमळनेर शहराचे मलमूत्र विसर्जनाचे सांडपाणी नदीच्या डबक्यांमध्ये साचलेले होते . ते वातावरण रोगराईस पोषक होते. आलेल्या पुरामुळे सर्व घाण वाहून गेली नदीपात्र स्वच्छ होऊन आरोग्याच्या तक्रारी दूर होतील असे जाणकारांचे मत आहे. उगमस्थानावरील रात्री पडलेल्या पावसामुळे बोरी नदीवरील तामसवाडी धरण संपूर्ण क्षमतेचे भरून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शेतकऱ्यांनी आपले गुरेढोरे नदीपात्रापासून दूर उंचावर, सुरक्षित स्थळावर न्यावेत. काम नसताना नागरिकांनी नदीकडे जाऊ नये अशा सूचना शासनामार्फत देण्यात येत आहेते.
Post a Comment