अहिर स्वर्णकार समाज उधना सुरत तर्फे ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा संपन्न.
जळगाव प्रतिनिधी
अहिर स्वर्णकार समाज उधना सुरत येथे सालाबादा प्रमाणे मंडळात यावर्षीही भव्य दिव्य असा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. मंडळातर्फे दरवर्षी अनेकानेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्या अनुषंगाने समाज अध्यक्ष श्री अनिल शेठ जगन्नाथ दुसाने यांच्या संकल्पनेतून उत्सव समितीतर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सन्मानपत्र,शाल, टोपी व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 28 वर्षांपूर्वी हा ज्येष्ठ नागरिक सन्मान पुरस्कार देण्यात आला होता. असा भव्य दिव्य ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा दरवर्षी मंडळाच्या माध्यमातून साजरा केला जाईल अशी माहिती श्री अनिल शेठ दुसाने यांनी दिली. तसेच समाजातील समाजसेवकांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मरणोत्तर समाजभूषण पुरस्काराने त्यांच्या नातलगांना शाल, टोपी स्मृतीचिन्ह देऊन अनिल शेठ दुसाने यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यात
कै.स्व. भिकाजी दामोदरशेठ वाघ
कै.स्व. नागो भावडूशेठ थोरात
कै. स्व. बंडूनाना नारायणशेठ दुसाने
कै. स्व. रामदास नथ्थुशेठ विसपुते
कै.स्व. मगनलाल ताराचंदशेठ अहिरराव
कै.स्व. सुरेश शिवरामशेठ वानखेड़े
कै.स्व. कमलाकर गणपतशेठ आघारकर
कै.स्व. भास्कर बापुरावशेठ आघारकर
कै. स्व. यशवंत शंकरशेठ भामरे
कै.स्व. हिरामण एकनाथशेठ दुसाने
कै.स्व.लोटन तुळशिरामशेठ विसपुते
कै.स्व. विठ्ठल बाबूरावशेठ विसपुते इत्यादींना मरणोत्तर समाजभूषण पुरस्कार देण्यात आला.
या कार्यक्रमाला मान्यवर श्री अभिमन्यू रामदास शेठ विसपुते ट्रस्टी प्रमुख श्री जगन्नाथ दगडूशेठ सोनवणे, रघुनंदन एकनाथ शेठ अहिरराव अनिल जगन्नाथ शेठ दुसाने जगदीश सेठ दुसाने विलास शेठ दुसाने व दिलीप शेठ इंगळे इ. मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment