गिरणेकाठचा नेता: जनतेसाठी झिजलेला दीपस्तंभ - नानासाहेब श्री. प्रतापराव हरी पाटील"नेतृत्व,नम्रता आणि निस्वार्थ सेवा ही त्रिसूत्री वर आधारित नानासाहेबांचे लोकाभिमुख कार्य.
भडगाव [ प्रतिनिधी].. सुभाष ठाकरे
गिरणा नदीच्या साक्षीने घडलेलं नेतृत्व, जे समाजहितासाठी निःस्वार्थ झिजलं आणि परिवर्तनाची नवी दिशा दाखवली. गिरणा नदीच्या सागरासारख्या शांत आणि कधी गरज पडल्यास ओघवत्या प्रवाहात एक नेता घडत होता नानासाहेब श्री. प्रतापराव हरी पाटील. ग्रामीण भागातील शिक्षण, शेती, आणि सामाजिक प्रश्न यांच्यातून वाट काढत त्यांनी केवळ राजकारण नव्हे, तर समाजकारणही जपलं. त्यांचं नेतृत्व हे प्रकाशस्तंभासारखं होतं.अंधारात अडकलेल्या जनतेला दिशा देणारं.त्यांच्या कार्यशैलीत जनतेशी जोडलेपण, विकासाची दूरदृष्टी आणि नैतिकता यांचा संगम दिसतो. गिरणेकाठच्या मातीशी नाळ जोडलेला हा नेता आजही अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे.
गिरणा नदीच्या साक्षीने घडलेलं नेतृत्व, जे समाजहितासाठी निःस्वार्थ झिजलं आणि परिवर्तनाची नवी दिशा दाखवली.गिरणा नदीचं पाणी जसं सातत्याने वाहत राहतं, तसंच नानासाहेबांचं कार्य समाजासाठी अखंड वाहत आहे. अशाच कार्यशील प्रवाहात एक नाव विशेषत्वानं उठून दिसतं नानासाहेब श्री. प्रतापराव हरी पाटील. हे नाव म्हणजे केवळ एक राजकीय व्यक्तिमत्त्व नव्हे, तर समाजासाठी झिजलेलं दीपस्तंभ, जो अंधारात असलेल्या जनतेला नवी दिशा दाखवतो, नवसंजीवनी देतो.
गिरणा नदीचं शांत, सुसाट आणि सातत्याने वाहणारं पाणी जस परिसराला पोषण देतं, तसं नानासाहेबांचं व्यक्तिमत्त्वं समाजाला दिशा आणि ऊर्जा देतात आणि परिवर्तनाची चळवळ घडवतात. अशाच नेतृत्वाच्या ओघातून घडलेलं एक नाव म्हणजे नानासाहेब श्री. प्रतापराव हरी पाटील.त्यांचं जीवन आणि कार्य हे केवळ राजकीय प्रवास नाही, तर समाजकारणाचं एक उर्जास्रोत आहे.ते एक असे नेता आहेत, जे खाली वाकून, लोकांसोबत चालणाऱ्या नेतृत्वाचं मूर्त स्वरूप आहेत. त्यांनी सत्ता हे साधन मानलं, पण समाजहित हेच अंतिम ध्येय ठेवलं.त्यांची वाटचाल आमडदे या गिरणेकाठच्या गावातून सुरू झाली आणि जनतेच्या मनात पोहोचली. त्यांनी ना केवळ आपल्या भागाचा विकास केला, तर अनेकांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. म्हणूनच त्यांचं नाव उच्चारलं जातं तेव्हा, लोक केवळ नेता नाही, तर एक कार्यकर्ता, मार्गदर्शक, आणि दीपस्तंभ म्हणून त्यांचं स्मरण करतात.
लढता लढता हरलो जरी,
हरल्याची मला खंत नाही....
लढा माझा माझ्यासाठी
लढाईला माझ्या अंत नाही....
पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन...
*मातीशी नाळ, माणसांशी नातं:*
कुटुंबातच राजकारणाचे बाळकळु लागलेले नानासाहेबांचे वडील
कर्मवीर कै.हरी रावजी पाटील जळगाव जिल्ह्यातील प्रतिभावान व मातब्बर राजकारणी होते.आई कै. कमलताई हरी पाटील या उत्तम गृहिणी, संस्कारांचा महामेरू होत्या. मोठे बंधू दादासाहेब कै युवराज हरी पाटील ख्यातवान अभियंता म्हणून ओळख होती.दुसरे बंधू कै. आण्णासाहेब अशोक हरी पाटील सहकार क्षेत्रात मातब्बर व ख्यातनाम व्यक्तिमत्व म्हणून जनमानसात प्रसिद्ध होते. नासाहेबांच्या पत्नी वात्सल्यसिंधू कै. साधनाताई प्रतापराव पाटील या उत्तम गृहिणी,सहकार क्षेत्रातील जाणकार,किसान परिवारावर आईच्या मायेची झालर पांघरविणाऱ्या होत्या. कुटुंबातील आदर्श व्यक्तींच्या अकाली निधनाने नानासाहेब न खचता सामाजिक,राजकीय,धार्मिक व शैक्षणिक कार्यात नेहमी अग्रेसर राहिले. समाजोपयोगी कार्यात नेहमी अग्रेसर राहून नानासाहेबांनी आपल्या स्वकीयांच्या आठवणी नेहमी जिवंत ठेवल्या.
नानासाहेब श्री. प्रतापराव हरी पाटील यांचं बालपण गिरणेकाठच्या खेड्यात आमडदे गावात गेलेलं. त्यांनी लहानपणापासूनच समाजातील समस्या जवळून अनुभवल्या त्यात शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणीटंचाई, बेरोजगारी, शिक्षणाचं दुर्लक्ष. या सर्व अडचणींनी त्यांना संघर्षमय जीवनाची शिकवण दिली.पण त्यांनी या समस्यांपुढे हार न मानता, त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी आपलं नेतृत्व केवळ निवडणुकीपुरतं मर्यादित ठेवलं नाही, तर जनतेच्या मनात जागा मिळवली.
नानासाहेबांच्या कन्या सौ पुनमताई प्रशांतराव पाटील आपल्या पित्याच्या खांद्याला खांदा लावून राजकीय,सामाजिक,धार्मिक व शैक्षणिक कार्यात नेहमी मदत करत असतात.जावई श्री प्रशांतराव विनायकराव पाटील मंत्रालयात उपसचिव पदावर कार्य करीत आहेत,त्यांची अनमोल व खंबीर साथ नानासाहेबांना मिळत आहे.
*दृष्टिकोन व कार्यशैली:*
"मी राजा नाही, सेवक आहे" ही त्यांची नेहमीची भूमिका असते.
त्यांनी ‘सर्वपक्षीय सहकार्य’ या तत्वावर भर दिला. कुठलाही पक्ष असो, समाजाच्या हितासाठी एकत्र काम करण्याची त्यांची तयारी असते.
स्थानिक तरुणांना शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगारासाठी त्यांनी विविध योजनांद्वारे मदत केली.
*सामाजिक कार्याची पायाभरणी:*
नानासाहेब प्रतापरावरी हरी पाटील यांनी राजकारणाला समाजसेवेचं माध्यम मानलं. ग्रामीण भागात वडिलांनी स्थापन केलेल्या कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षणसंस्थेला नावारूपाला आणले,आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं, ग्रामीण भागातील मुलांना मोफत शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली.त्यांची कार्यशैली 'सर्वांसाठी विकास, सर्वांच्या सहभागातून' अशी होती. त्यांनी गावोगाव जाऊन लोकांच्या अडचणी ऐकल्या, त्यासाठी निधी उभारला, सरकारी योजनांचा लाभ खेड्यापर्यंत पोहोचवला. जिल्हा दूध संघाच्या मदतीने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले. आमडदे गावात अगणित विकास कामे केली. त्यात रस्त्यांचे काँक्रीटीकरण,गटारी,पाण्याची टाकी,दलीत रस्ते,दुष्काळी परिस्थितीत गावाला पाण्याची सुविधा,गावातील मंदिरांचे पुनरुज्जीवन, आई मुदाई मातेच्या मंदिरासाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिला.आदी कामे करून त्यांनी गावाचा विकास केला.
*राजकीय नेतृत्वाची ठसठशीत छाप:*
राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले नानासाहेब श्री. प्रतापराव हरी पाटील हे नेतृत्व करताना पक्षापेक्षा विचारांना अधिक महत्त्व देतात. लोकशाही मूल्यांवर निष्ठा ठेवून त्यांनी आपल्या मतदारसंघात विकासाच्या अनेक योजना राबवल्या.
त्यांचं राजकारण हे सत्तेसाठी नव्हे, तर समाजबांधणीसाठी होतं. त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाला पक्षभेद न बघता सर्वसामान्य लोकांनी मान्यता दिली.नानासाहेबांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात आमडदे ग्रामपंचायती पासून केली. गावाच्या इतिहासात विक्रमी प्रथम नागरिक म्हणून सरपंच होण्याचा मान नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांना जातो. गावाच्या इतिहासातच नव्हे तर खानदेशातील राजकारणात एकमेव उदाहरण म्हणून गावातील गावकऱ्यांच्या साक्षीने तीनही सहकारी संस्थांवर प्रमुख म्हणून भूमिका निभावली.त्यात आमडदे ग्रामपंचायत सरपंच, विविध कार्यकारी विकास सोसायटीचे चेअरमन, कै दीनानाथ दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन. शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा- भडगाव चे मा.सभापती व संचालक. आदी राजकीय पदांवर त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवीलेला आहे. राजकीय पदांवर भूमिका निभावित असताना ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचा विकास या भूमिकेला प्राधान्य घेऊन संस्था आणि शेतकरी यांच्यातला दुवा म्हणून कार्य पार पाडले.
*राजकीय वाटचाल – समाजसेवेची दिशा:*
त्यांनी राजकारणाकडे कधीही ‘सत्ता’ म्हणून पाहिलं नाही. ते राजकारणाला समाजपरिवर्तनाचं साधन मानतात.सुरुवातीला त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून कार्य सुरू केलं,ते लोकप्रतिनिधी म्हणून पुढे आले.सहकारी संस्थांवर विशेष कार्य करणारे नेते म्हणून त्यांची ख्याती आहे. नानासाहेब समाजकार्यात नेहमी अग्रेसर असतात.दरवर्षी वाढदिवसानिमित्त संकटात सापडलेल्या व्यक्तींना मदत करणे,ही नानासाहेबांची ख्याती आहे.त्यात केरळ येथील सुनामी ग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत, कोकणात अतिवृष्टी ग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत,कोरोना काळात मृत्यू झालेल्या परिवाराला आर्थिक मदत व त्यांच्या पाल्यांचा शैक्षणिक खर्च केला, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या परिवाराला आर्थिक मदत, शहीद जवानांच्या परिवाराला आर्थिक मदत, यावर्षी पाचोरा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी ग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची किराणा किट देऊन त्यांना मदत केली.समाजोपयोगी कार्यक्रमात नानासाहेब प्रतापराव हरी पाटील नेहमी अग्रेसर असतात.
*जनतेशी नातं – हक्काची माणसं:*
त्यांची खरी ताकद म्हणजे जनतेशी असलेलं नातं.मतं मिळवण्यासाठी नव्हे, तर माणसं जोडण्यासाठी ते लोकांमध्ये राहतात.त्यांच्या कार्यपद्धतीत ‘संवाद, समज, आणि समर्पण’ या तीन गोष्टींचा नेहमी भक्कम पाया असतो.
*सन्मान आणि ओळख:*
त्यांच्या कार्याची दखल विविध पातळ्यांवर घेण्यात आली आहे. राजकीय,सामाजिक,शैक्षणिक, धार्मिक कार्यामुळे त्यांना जनतेने लोकनायक ही पदवी दिली.
अनेक शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना सरकारी व धार्मिक संस्थांनी त्यांचा यथोचित गौरव केला आहे.
नानासाहेब श्री. प्रतापराव हरी पाटील हे "विचारवंत, कार्यक्षम, आणि लोकाभिमुख" नेतृत्वाचं जिवंत उदाहरण आहेत.त्यांच्या कार्यात आपल्याला सच्चं नेतृत्व, निःस्वार्थ समाजसेवा आणि परिवर्तनासाठीचा ध्यास या सगळ्यांचा संगम दिसतो.
गिरणेकाठी घडलेल्या या नेत्याचा प्रवास आपल्याला शिकवतो की – "नेता तोच, जो अंधारात प्रकाश देतो, आणि पाठीशी उभा राहतो."आजच्या तरुणांनी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन सामाजिक बांधिलकी, नैतिकता आणि संवेदनशीलता यांचा वारसा पुढे न्यावा, हीच खरी कृतज्ञता ठरेल.
संकलन
प्रा श्री नरेंद्र तुळशीराम भोसले
(एम ए एम एड मराठी - राज्यशास्त्र)
गोपीचंद पूना पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोळगाव ता. भडगाव जि.जळगाव
Post a Comment