जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेत पोलीस विनोद अहिरे यांचे उत्कृष्ट सूत्रसंचालन; पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव
जळगाव [ प्रतिनिधी ]...
दिनांक १७/०९/२०२५ ते १९ सप्टेंबर या दरम्यान जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धेमध्ये कबड्डी, खो-खो, भालाफेक, गोळा फेक, हॉकी, फुटबॉल अशा सांघिक खेळांसह वैयक्तिक खेळांचा देखील आयोजन करण्यात आले होते. दिनांक १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव जिल्हा पोलीस दलातील साहित्यिक /कवी पोलीस विनोद अहिरे यांनी आपल्या ओजस्वी आणि तडफदार संवाद फेकीने करून उपस्थितांची मने जिंकून कार्यक्रमांमध्ये बहार आणली. त्यामध्ये खास करून त्यांच्या स्वलिखित कविता आणि शायरीने शेवटपर्यंत कार्यक्रमाची रंगत वाढत गेली. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपाधीक्षक नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत शुगरवार यांनी अभिनंदन केले आहे.
Post a Comment