🚩🚩 तुलसीनगरात महाशिवरात्री च्या पर्वावर निर्माणाधीन श्री महादेव मंदिराचा भूमीपूजन सोहळा🚩🚩
. आज दि.15.2.2026 रविवार रोजी तुलसीनगर एस एमआईटी कॉलेज रोडच्या ओपन स्पेसमध्ये जळगांव शहराचे आमदार श्री राजूमामा भोळे, महापौर सौ दिपमाला काळे, उपमहापौर श्री मनोज चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक श्री दिपकजी सुर्यवंशी, नगरसेवक श्री नरेंद्रजी पाटील, नगरसेवक श्री सागर पाटील, नगरसेविका सौ जयश्री राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. भुमिपूजन श्री नितीनाजी लाठी दाम्पत्यांने केले.प्रसंगी आमदार महोदयांनी तुलसीनगरातील निर्माण होणारे शिवमंदिर तुलसी रोपांनी व ऑक्सिजन पूर्वक होईल आणि तुलसीनगरात राहिलेले अ्पूर्ण कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमास जेष्ठ नागरिक श्री रमेशचंद्रजी छाजेड, श्री बाळासाहेब सोनवने, श्री लापसिया तसेच नंदुरबारचे उप जिल्हाधिकारी श्री देशमुख साहेब ,श्री जितेंद्रजी छाजेड, जगदिशजी खंडेलवाल, श्री नितीनजी लाठी, श्री योगेशजी बिरला , श्री पवनजी माहेश्वरी, श्री संदिपजी ठाकुर, डॉ. विकास पाटील, श्री मौर्य साहेब प्रसंगी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री सागरजी धनाड आणि आभार श्री राजेंद्र पाटील सरांनी मानले प्रसंगी सर्व ज्येष्ठ नागरिक, युवक व महिलांची उपस्थिति होती.
Post a Comment