ad headr

Powered by Blogger.

भडगावच्या क्रीडा इतिहासात सुवर्णक्षण! ‘आमदार चषक’ डे-नाईट क्रिकेट स्पर्धेत आशीर्वाद रॉकर्स ठरले ‘किंग’;

​भडगाव: [ प्रतिनिधी ].सुभाष ठाकरे क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जोपासण्याच्या उद्देशाने भडगाव तालुक्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेली ‘आमदार चषक’ (पर्व तिसरे) ही भव्य-दिव्य डे-नाईट क्रिकेट स्पर्धा प्रचंड उत्साहात पार पडली. या अटीतटीच्या स्पर्धेत आशीर्वाद रॉकर्स संघाने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर विजेतेपदावर नाव कोरले, तर इतिहास ११ संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
.      स्वर्गीय बापूजी फाऊंडेशनचे संस्थापक लखिचंद पाटील यांच्या वतीने या ऐतिहासिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे शानदार उद्घाटन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. भडगावच्या क्रीडा इतिहासातील ही पहिलीच डे-नाईट स्पर्धा असल्याने क्रीडाप्रेमींमध्ये सुरुवाती पासूनच मोठी उत्सुकता होती.
​     दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत एकूण ८ नामांकित संघांनी सहभाग नोंदवून आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. दूधिया प्रकाशात न्हाऊन निघालेल्या मैदानात खेळाडूंनी चौफेर फटकेबाजी करत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. अंतिम सामन्यात आशीर्वाद रॉकर्स आणि इतिहाद ११ यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळाली. मात्र, मोक्याच्या क्षणी आशीर्वाद रॉकर्सचा कर्णधार प्रशांत सोलुके, भुषण वाडेकर यांनी खेळावर पकड मिळवत जेतेपद पटकावले. बक्षीस वितरण प्रसंगी आमदार पुत्र सुमित पाटील याच्या हस्ते करण्यात आले
​    या स्पर्धेमुळे भडगाव तालुक्यातील क्रीडाविश्वाला एक नवी दिशा मिळाली आहे. हजारो नागरिक आणि युवकांच्या उपस्थितीने परिसर गजबजून गेला होता. खेळाडूंचा उत्साह आणि आयोजकांची शिस्तबद्धता पाहून सर्वच स्तरातून क्रिकेट स्पर्धा आयोजन बाबत लखिचंद पाटील व त्यांच्या टीमचे अभिनंदन होत आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्वप्नील परदेशी, चेतन खैरनार, परीक्षित पाटील, हरीश परदेशी, नीरज खैरनार या सदस्यांनी अहोरात्र परिश्रम घेत
 नियोजनबद्ध कामगिरीमुळे ही क्रिकेट स्पर्धा कोणत्याही व्यत्यय शिवाय यशस्वी पणे पार पडण्यात यश आले.

No comments