बसची वाट पाहणाऱ्या 80 वर्षीय वयोवृद्धाच्या दोन्ही पायांवर बसचे पुढचे चाक; वयोवृद्ध गंभीर जखमी भडगाव बस स्थानकातील घटना.
भडगाव - [ प्रतिनिधी ]. सुभाष ठाकरे
येथील बस स्थानकात बसची वाट बघत उभे असलेल्या ८० वर्षीय वयोवृद्धाच्या दोन्ही पायांवर बसचे पुढचे चाक चढवल्याने 80 वर्षीय वयोवृद्ध गंभीर जखमी झाले. असून याबाबत त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान भडगाव बस स्थानकात घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव बस स्थानकात सुभाषचंद हुकुमचंद जैन वय ८० रा. कजगाव हे आपल्या गावी जाण्यासाठी बस ची वाट बघत उभे असताना बस स्थानकात ठाणे- पाचोरा बस क्र.एम.एच.१४ एल.एक्स. ३६४१ या बसच्या कंडक्टर साईड पुढील चाकात त्यांचे दोन्हीं पाय चाकाखाली गेल्याने रक्तबंबाळ झाले होते यावेळी बस स्थानकातील प्रवाशांनी तात्काळ रिक्षा बोलावली रिक्षात घेऊन जात असताना त्या
ठिकाणी रुग्णवाहिका आली. व त्या रुग्णवाहिकेत घेऊन ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्यांनी प्रथमोपचार केला परंतु गंभीरइजा असल्याने त्यांना तात्काळ चाळीसगाव येथील पुढील उपचारासाठी पाठवले. याबाबत सायंकाळपर्यंत भडगाव पोलीस स्टेशनला कुठलीही नोंद झालेली नव्हती
Post a Comment