अमळनेर शहरातील मोकाट जनावरांचा व कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा खुर्च्या खाली करा .. नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया
अमळनेर दि. 09 ( प्रतिनिधी) शहरात जिकडे तिकडे मोकाट जनावरे व बेवारीस कुत्रे यांचा सुळसुळाट आहे. त्यांच्या मुक्त संचारामुळे अनेक वेळा अपघात होतात व नागरिकांना भुरदंड बसतो. अपघात झाल्यामुळे वेळ, पैसा, जीवाचे हाल, आणि मनस्ताप या गोष्टींना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. अनेक वर्षापासून मोकाट कुत्र्यांचा आणि जनावरांचा प्रश्न गंभीर असून नवीन सत्ताधाऱ्यांनी तो प्रश्न मार्गी लावावा हे त्यांच्यासमोरील मोठे आव्हान आहे.
दोन महिने उलटून सुद्धा सत्याधारांचे कोणतेही कामे नजरेत पडत नाहीत. परंतु शिर्डी साईबाबा दर्शन, मुंबई सिद्धिविनायक दर्शन आशा सहली फिरण्यामध्ये सत्ताधारी व्यस्त दिसत आहेत अशा नागरिकांच्या दबक्या आवाजात चर्चा सुरू आहेत. 24 तास पाणीपुरवठा या नावाखालील योजने मुळे सगळ्या रस्त्यांची अक्षरशा चाळण झालेली आहे. विकासक जसे रस्ते खोदून ठेवतात त्या पद्धतीने त्यांना पूर्वस्थितीत आणून देत नाहीत. निदान खोदलेला रस्त्यांची पेचेस भरण्याचे काम त्यांनी युद्ध पातळीवर करावे. अन्यथा ते काम बंद करावे असे नागरिकांचे मत आहे. पिसाळलेल्या मोकाट कुत्रे चावल्यामुळे अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. प्रसंगी रेबीज होऊन जीवास मुकावे लागलेले आहे अशा अनेक घटना घडलेल्या आहेत.
नगरपालिका सत्ता चालवणे म्हणजे नुसते मोठे मोठे बॅनर लावणे नाही अशा संतप्त भावना नागरिकांच्या उमटत आहेत. नगरपालिका प्रशासनाने विस्कटलेली विकासाची घडी सुस्थितीत आणावी व मोठ्या अपेक्षेने नागरिकांनी केलेल्या मतदानाचे मोल जाणून त्यांच्या भाबड्या आशा पूर्ण कराव्यात हीच सत्ताधाऱ्याकडून अपेक्षा.
Post a Comment