ad headr

Powered by Blogger.

जळगाव महानगरपालिकेत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न..

जळगाव [ प्रतिनिधी ] 26  जानेवारी 2026.भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन.जळगांव शहर महानगरपालिका जळगांव यांचे विद्यमाने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
   प्रारंभी प्रशासक तथा आयुक्त मा.ज्ञानेश्वर ढेरे साहेब यांनी भारतीय संविधानाचे प्रास्ताविक वाचन केले.त्यानंतर उपस्थित नगरसेवक , पदाधिकारी , अधिकारी व कर्मचारी सर्वांनी सामुदायिकरित्या प्रास्ताविक वाचन केले .
.     तद्नंतर आयुक्त मा.ज्ञानेश्वर ढेरे साहेब यांनी आपल्या शुभ हस्ते ध्वजारोहण केले.त्यांचे सोबत अतिरिक्त आयुक्त मा.शोभा बाविस्कर मॅडम उपस्थित होत्या.ध्वजारोहण नंतर सर्वांनी राष्ट्रीय ध्वजास सलामी दिली.त्यानंतर राष्ट्रगीत,ध्वज गीत व राज्य गीत म्हणण्यात आले.प्रजासत्ताक दिनाचा जय घोष करण्यात आला.
    संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन माजी कार्यक्रम अधिकारी आयु हरिश्चंद्र सोनवणे सर यांनी केले.ध्वजवंदन कार्यक्रमास नवनियुक्त नगरसेवक तसेच अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!

No comments