ad headr

Powered by Blogger.

जळोद–गांधली मुख्य पाईपलाईन फुटली; अमळनेरचा पाणीपुरवठा विस्कळीतअमळनेर

शहराला पाणीपुरवठा करणारी जळोद–गांधली येथील मुख्य पाईपलाईन अचानक फुटल्याने मंगळवारी अमळनेर शहराचा पाणीपुरवठा पूर्णतः विस्कळीत झाला. पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने नागरिकांना पाण्याच्या तीव्र गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
घटनेची माहिती मिळताच नगर परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेत मालेगाव येथून आवश्यक जॉईंट व क्लॅम्प मागवले आहेत. आज रात्रीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत दुरुस्तीचे काम पूर्ण करून टाकी भरून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, पाईप लाईन अतिशय जीर्ण झाली आहे. त्याठिकाणी मशीनरी मागवली आहे जनरेटर ने पाईप कट करून लवकर पाईपलाईन दुरुस्ती केली जाईल अशी माहिती पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील यांनी दिली.
दरम्यान, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल मुख्याधिकारी गणेश शिंदे व पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील यांनी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

No comments