ad headr

Powered by Blogger.

🔴जि .प. शिक्षक प्रवीण पाटील, पत्नी व दोन मुलांनी किरण प्रतापराव पाटील यास दंडुक्याने मारून व चावा घेऊन केले जखमी.. पोलिसात गुन्हा दाखल..

अमळनेर ( प्रतिनिधी )किरण लोखंडे.. गणेश कॉलनी तांबेपुरा येथे प्रतापराव पाटील यांचे स्वतःचे घर व खाली प्लॉट आहे. यांच्या शेजारी प्रवीण राजधर पाटील प्राथमिक शिक्षक राहतात. शौचालयाचे पाणी सतत आमच्या प्लॉटमध्ये लिकेज होत असते त्यामुळे आम्हाला सतत दुर्गंधी येऊन आरोग्यास नेहमी त्रास होतो. अशा आशयावरून बऱ्याच वेळा दोघांमध्ये वाद होतात. 25 जानेवारी रोजी असाच वाद प्रवीण पाटील यांचा सुरू होता. वाद सुरू असताना किरण प्रतापराव पाटील वय 36 हा काही कारणास्तव सुट्टी काढून सुरत वरून अंमळनेरला आला होता. 
घरी पोचताना प्रवीण पाटील हे आई आणि वडिलांशी हुज्जत घालताना आढळून आला. माझ्या वडिलांना शिवीगाळ काय करतो असे विचारल्यानंतर तुझ्या वडिलांना का डोक्यावर धरून नाचू का? असा असभ्य प्रश्न करून किरण पाटील यांना राग येईल या भाषेत खडसावले. तुम्ही प्रत्येक वेळा माझ्या म्हाताऱ्या आई बापाला तुमची चूक असून सुद्धा नेहमी शिवीगाळ करत असतात तुम्ही तुमचे पाणी बंद करून घ्या सौचालयाचे पाणी आमच्या प्लॉटमध्ये टाकू नका ,आपल्या तक्रारी, वाद होणार नाहीत असे म्हटल्यावर ,त्यांना राग आला आणि प्रवीण पाटील यांनी त्यांच्या दोघं मुलांना याला आज बघूनच घ्या याला आज मारूनच टाका अशी चिथावणी देऊन शुभम प्रवीण पाटील व यश प्रवीण पाटील हे लाकडी दांडूका घेऊन किरण पाटील यांच्या अंगावर धावून गेले व पत्नी मीनल प्रवीण पाटील यांनी गचांडी धरून चौघांनी संगणमत करून त्याला लोढवले व गालावर, डोक्यावर व पाठीवर दांड्याचे वार करून व मीनल प्रवीण पाटील यांनी बोटाला दातांचा चावा घेऊन जखमी केले. 
आशा पद्धतीची तक्रार किरण प्रतापराव पाटील वय (36) यांनी अमळनेर पोलीस स्टेशन येथे कलम 118 /1 ,3 /5, 351/2 व 352 या कलमांद्वारे गुन्हा नोंद केला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गोपाल सोनवणे हे करीत आहेत.

No comments