अमळनेर पोलीस प्रशासनाचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या अभावामुळे गुन्हेगारीवरचा वचक संपला.. नागरिकांची प्रतिक्रिया.
अमळनेर दि. 14.(प्रतिनिधी) शहर व तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून चोऱ्यांचे, हाणामारीच्या तसेच अवैध धंद्यांना ऊत आलेला दिसतो. तात्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव साहेब यांनी लोक वर्गणीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. अनेक लोकप्रतिनिधीनी आमच्या स्थानिक निधीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ अशा वल्गना केल्या होत्या
परंतु अर्ध्याधीक शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसलेच नाही. परिणामी त्या परिसरांमध्ये चोऱ्यामाऱ्या, दंगे धोपे आणि अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. जणू काही अमळनेर शहरांमध्ये पोलीस प्रशासन कार्यरत आहे की नाही अशी शंका येते. रात्रीची गस्त ,नाही पेट्रोलिंग नाही, चोऱ्यांचे सत्र आणि घरफोडीचे सत्र अमळनेर मध्ये नित्याचे झाले आहेत.
प्रभाग क्रमांक एक पासून ते प्रभाग क्रमांक 18 पर्यंत सर्व दूर चौकाचौकांमध्ये आणि मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले पाहिजे अशी अनेक वर्षापासून अंमळनेर शहर वासियांची मागणी आहे. अमळनेर शहरांमध्ये अल्पसंख्या बहुसंख्यांमध्ये अनेक वेळा दंगे झाले आहेत परंतु प्रशासनाच्या जवळ ठोस पुरावे अभावी फिर्यादींवर अन्याय होऊन आरोपी मोकाट फिरताना आढळून येत होते. कोणी कोणाचा वाली नाही. कोणाचे कोणाला भय नाही. पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अनेक सट्टा, मटका च्या पिढ्या, अनधिकृत दारूचे अड्डे, जोमाने सुरू आहेत. जणू काही अंमळनेर शहरांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे
Post a Comment