वाक येथे श्री.दत्तु प्रभुंचा दि.१३ रोजी यात्रोत्सव.
भडगाव दि.12 प्रतिनिधी:-[ सुभाष ठाकरे ] तालुक्यातील वाक येथे श्री.दत्तप्रभुंचा याञोत्सव दरवर्षाप्रमाणे यावर्षीही दि. १३ रोजी शनिवारी भरणार आहे. याञोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी मंगल स्नान, सायंकाळी ५ वाजता आरती, सायंकाळी पालखीचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात्रेनिमित्त दरवर्षी १० ते १२ लोकनाटय तमाशाचे कार्यक्रमही राञी होत असतात.याही वेळी राञी ७ ते ८ लोकनाटय तमाशांचे कार्यक्रम होणार आहेत.
तसेच तमाशांच्या हजेरींचा कार्यक्रम दुपारी ४ वाजता होणार आहे. याञोत्सवात मोठ्या प्रमाणात लहान, मोठे पाळणे, संसार उपयोगी, कटलरी दुकाने, मिठाईचे दुकाने मोठ्या प्रमाणात भरत असतात. यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे दुपारी २ वाजेपासुन रात्रभर ही यात्रा अविरतपणे चालु असते. या यात्रोत्सवासाठी परीसरातील अनेक गावांचे भाविक, नागरीक या याञोत्सवात सहभागी होत असतात. तरी दर्शनासह यात्रोत्सवाचा लाभ भाविकांनी घ्यावा. असे आवाहन वाक येथील ग्रामस्थ मंडळी आयोजकांमार्फत करण्यात आलेले आहे.
Post a Comment