२४ वा अर्थात द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार
जळगाव दि. 13. [ प्रतिनिधी ] -
भारतीय अभिजात संगीताचा खानदेशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारूपास आलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने दि. ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी करण्यात येणार आहे. २४ या अर्थात द्वितपपूर्ती महोत्सव छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात संध्याकाळी ७ ते १९ या वेळेत संपन्न होणार आहे. सन २०२५-२६ हे वर्ष स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाचे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून प्रतिष्ठान साजरं करीत आहे.
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून साजरा होणाऱ्या या २४ व्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., व संस्कृती मंत्रालय भारत सरकार असून सुहान्स केमिकल्स प्रा. लि., जाई काजळ, वेगा केमिकल्स प्रा. लि. होस्टिंग ड्युटी अर्थात चांदोरकर टेक्नॉलॉजीस प्रा. लि. यांचेही सहकार्य असणार आहे. भारतीय अभिजात संगीताच्या विश्वात जळगावचे नाव अधोरेखित करणाऱ्या या महोत्सवात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलावंतांना प्रतिष्ठानाने निमंत्रित करण्यात आलेले आहे
महोत्सवाची सुरुवात दि ९ जानेवारी रोजी उद्घाटन समारंभा नंतर होईल प्रथम सत्रात तरूण पिढिचे प्रतिनिधित्व करणारी मुळची आसामची असलेली व सध्या मुंबईत स्थानिक एक अत्यंत गुणी व प्रतिभासंपन्न गायिका श्रृती बजरबरुहा हिच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने होणार आहे. तिला अभिनय रवंदे संवादिनीवर तर रोहित देव तबल्यावर साथसंगत करतील, द्वितीय सत्रात जागतिक किर्तीचे सतार वादक चिराग कुट्टी आपले सतार वादन सादर करतील त्यांना तबल्याची साथ अमेरीकेत स्थानिक असलेले विवेक पंड्या करतील,
द्वितीय दिनाच्या प्रथम सत्रात मुंबईचे जगविख्यात सारंगी वादक व उस्ताद सुलतान खान यांचे चिरंजीव उस्ताद साबीर खान आपले सारंगी वादन सादर करतील त्यांना तबल्यावर साथ संगत विवेक पंड्या
करतील.
द्वितीय सत्र मुंबई ची प्रख्यात कथक नृत्यांगना निधी प्रभू व सुप्रसिध्द फ्लेमिंको नृत्यकार कुणाल ओम यांच्या कथक-फ्लेमिको जुगलबंदीने संपन्न होईल त्यांना तबला संगत रोहित देब, काहोन व तबला विनायक गवस, संवादिनी थ गायन श्रीरंग टेंबे हे करणार आहेत.
तृतीय दिनाचे प्रथम सत्र प्रख्यात शास्त्रीय व उपशास्त्रीय गायिका यशस्वी सरपोतदार यांच्या गायनाने होईल त्यांना तबला साथ तेजोवृष जोशी व संवादनि साथ अभिनय रवंदेकरणार आहेत.
नादस्वरम्, तावील व मृदुंग याचे सहवादन. या कॉन्सर्ट चे शिर्षक आहे कॅर्नाटिक क्वॉर्टेट आंतराष्ट्रिय ख्याती प्राप्त कलावंतांचा सहभाग या सहवादनात्त असणार आहे हे सहबादन श्रेया देवनाथ (इलेक्ट्रिक व्हायोलीन) एम कार्तिकेयन (नादस्वरम्) प्रविण स्पर्श (मृदुंगम्) गुम्मीडिपौंडी जीवा (तबिल) सादर करतील.
२४ व्या महोत्सवाच्या निमित्ताने जळगावच्या नुपुर खटावकर सह कोमल चौहान, हेतल चौहान, साक्षी माळी, स्नेहल फडके, तनया पाटील हे कलाकार गणेश वंदना सादर करणार आहेत.
तरुण पिढीने ऐकावा आणि जुन्या पिढीने सुद्धा ऐकावा असा हा स्वरोत्सव असून या तीनही दिवसांचे सूत्रसंचालन मुंबईच्या सुसंवादिनी सौ. मंगला खाडिलकर करणार आहेत. तमाम जळगावकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन या द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सवाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व या महोत्सवाच्या विविध प्रायोजकांनी केले आहे.
कार्यक्रम वेळेवर सुरू होण्यासाठी रसिकांनी वेळेवर येणे आवश्यक आहे.
प्रवेशिकेसाठी सौ. दीपिका चांदोरकर यांच्याशी मोबाईल क्र. ९८२३०७७२७७ यांच्याशी संपर्क करावा अशी माहिती प्रतिष्ठानाच्या वतीने विवेकानंद कुलकर्णी, दीपक चांदोरकर, अरविंद देशपांडे, नुपर खटावकर, अनुश्री कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद माहिती दिली.
Post a Comment