प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची अविष्कार स्पर्धेत निवड.
अमळनेर -दि. 12 [ प्रतिनिधी ].विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाला चालना देण्याच्या उद्देशाने व उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांना संशोधनात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या “आविष्कार “ या पोस्टर स्पर्धेत दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी आर्ट्स,कॉमर्स व सायन्स कॉलेज धरणगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रताप महाविद्यालय(स्वायत्त), अमळनेर येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील 10 (5 पोस्टर्स) विद्यार्थीं सहभागी झाले.त्यापैकी 4 विद्यार्थ्यांची निवड कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे होणाऱ्या पुढील फेरीसाठी झाली आहे.
निवड झालेले विद्यार्थी
१.नेतल माधवानी
२. रोशनी सोनार
३.आदित्य पाठक
४.अनिकेत राठोड
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव ,खा.शि.मंडळ चिटणीस प्रा.पी.पी.पाटील तसेच परीक्षा नियंत्रक प्रा.शशिकांत जोशी यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
अविष्कार समिती प्रमुख डॉ.रवी बाळसकर,संघ व्यवस्थापक प्रा.रामदास सुरळकर,प्रा.विवेक बडगुजर, डॉ.विजय तुंटे,डॉ.रमेश माने,प्रा.डॉ कांबळे, डॉ.बालाजी कांबळे ,प्रा.हर्षल सराफ यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
यशस्वी विद्यार्थ्यांना सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा.शशिकांत जोशी,प्रा.हेमलता सूर्यवंशी-भोसले यांचे मार्गदर्शन लाभले .इतर सहभागी विद्यार्थ्यानाही प्रा.वैशाली महाजन व प्रा.नेहा महाजन यांनी मार्गदर्शन केले.खा.शि .मंडळ पदाधिकारी,डॉ.धिरज वैष्णव,डॉ.अमित पाटील,ग्रंथपाल दिपक पाटील,डॉ.जितेंद्र पाटील,प्रा.विजय साळुंखे,अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्षचे डॉ.मुकेश भोळे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि दिनांक 30 व 31 डिसेंबर रोजी होणाऱ्या द्वितीय फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.
Post a Comment