भाजप कार्यालय येथे ७९वा स्वातंत्र्यदिनानिमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७९ व्या कार्यक्रम दिनांक १५ ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी ८:०० वाजता भाजप कार्यालय जी एम फाउंडेशन शिवाजी महाराज पुतळा समोर जळगाव येथे शहराचे आ सुरेश भोळे (राजू मामा ) यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात येणार असून वसंत स्मृती भाजप कार्यालय जुने बळीराम पेठ येथे ८:१५ वाजता जिल्हा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते सकाळी वाजता झेंडावंदन करण्यात येणार आहे यानंतर वसंत स्मृती येथूनच भव्य तिरंगा रॅलीला सुरुवात होणार असून ही तिरंगा रॅली घाणेकर चौक सुभाष चौक चित्रा चौक गणपती मंदिर मार्गे शिवतीर्थ मैदान येथे या तिरंगा रॅलीचा समारोप होईल या दोन्ही कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी, मंडल अध्यक्ष विविध आघाड्यांचे अध्यक्ष, युवा मोर्चा महिला आघाडी शक्ती केंद्रप्रमुख, बुथ प्रमुख व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यालय मंत्री प्रकाश पंडित यांनी केले आहे
Post a Comment