भडगाव बस स्थानकात निष्कृष्ठ दर्जाच्या कामामुळे बसला अपघात.
भडगाव बस स्थानकाचे कॉंक्रिटीकरणाचे काम काही महिन्यापूर्वी करण्यात आले होते. बस स्थानकात बस प्रवेश करते वेडी त्या ठिकाणी असलेल्या गटावरील ढापा. ठेकेदाराच्या निष्काळजी पणाने व निष्कृष्ठ दर्जाच्या कामामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गड्डा निर्माण झालेला होता. परंतु या गड्ड्याकडे परिवहन महामंडळाच्या दुर्लक्षामुळे दुपारच्या वेळेस जळगाव सटाणा बस क्रमांक एम. एच.२० बी. एल. ४२५३ मोठा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या बस मध्ये असलेल्या प्रवासांना किरकोळ प्रमाणात दुखापत झाली असल्याचे कळते.
यासंदर्भात कामचुकार व निष्कृष्ट दर्जाच्या काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर परिवहन महा मंडळ काही कारवाई करेल की नाही. असा प्रश्न. प्रवाशांना पडला आहे भडगाव तालुक्यातील व शहरातील बस प्रवासी यांच्या जीवाशी परिवहन महामंडळ यांनी खेळ मांडला तर नाही ना असे सुज्ञ नागरिकांमध्ये चर्चाआहे. आता या संबंधित ठेकेदारावर काय कारवाई होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून.
Post a Comment