युवा सेना सचिव आमदार वरुण सरदेसाई यांच्या हस्ते निष्ठा दहीहंडीच्या ट्रॉफीचे अनावरण
जळगाव [ प्रतिनिधी ].. दि. १४ युवा सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निष्ठा दहीहंडीच्या ट्रॉफीचे अनावरण शिवसेना सचिव आमदार वरून सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
युवा सेना उत्तर महाराष्ट्राची आढावा बैठक नुकतीच नाशिक येथे उत्साहात पार पडली या बैठकी प्रसंगी जळगाव युवा सेनेच्या वतीने आयोजित निष्ठा दहीहंडीच्या ट्रॉफी चे अनावरण शिवसेना सचिव तथा आमदार वरून सर्देसाई यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दहीहंडी समितीचे अध्यक्ष अमित जगताप व पदाधिकाऱ्यांनी दहीहंडी उत्सवाबाबत सरदेसाई यांना सविस्तर माहिती दिली या दहीहंडी उपक्रमाचे हे तिसरे वर्ष असून सरदेसाई यांनी दहीहंडी उत्सवाचे तोंड भरून कौतुक केले याप्रसंगी
युवासेनेचे कार्यकारणी सदस्य योगेशजी निमसे, सिद्धेशजी शिंदे, विस्तारक - प्रवीण चव्हाण,
विस्तारक - भूषण मुळाणे,
युवासेना जिल्हा युवाधिकारी निलेश चौधरी, युवासेना जळगाव जिल्हाप्रमुख पियुष गांधी, उपजिल्हाप्रमुख विशाल वाणी, निष्ठा दहीहंडी उत्सव समिती अध्यक्ष तथा विधानसभा क्षेत्र युवा अधिकारी अमित संजय जगताप, उपाध्यक्ष अंकित कासार सचिव गजेंद्र कोळी, महानगर प्रमुख यश सपकाळे, हर्षल मुंढे,जय मेहता, निलेश जोशी, सौरभ चौधरी,रोहन सपकाळे यांच्यासह आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment