ad headr

Powered by Blogger.

भडगाव येथे पाकिस्तानच्या बिलावल जरदारीचा पुतळा दहन

दि.१८/१२/२०२२
भडगाव प्रतिनिधी - सुभाष ठाकरे


भडगाव:-पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानच्या बिलावल जरदारीचा आज भडगाव येथे भाजपाच्या वतीने पुतळा तसेच पाकिस्तानचा झेंडा व नकाशा जाळून निषेध करण्यात आला.
यावेळी देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या समर्थनार्थ तसेच पाकिस्तान व बिलावल जरदारी यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
आंदोलनप्रसंगी तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील,जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील,शहराध्यक्ष बन्सीलाल परदेशी,किसान मोर्चा सरचिटणीस विनोद नेरकर,सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष बापू वाघ, शहर उपाध्यक्ष मनोज पाटील, शहर चिटणीस विश्वनाथ भोई, मनोहर चौधरी, व्यापारी आघाडी अध्यक्ष विजय वाणी, प्रशांत कुंभारे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष किरण शिंपी, युवा मोर्चा शहराध्यक्ष विशाल चौधरी, नरेंद्र पाटील, अनुसूचित जमाती आघाडी सरचिटणीस नामदेव मालचे, सुभाष मोरे, युवा वॉरीयर अध्यक्ष अमोल सोनार, युवा वॉरीयर सरचिटणीस कुणाल पाटील, सागर महाजन, सचिन महाजन, दिनेश महाजन, रितेश काळे, शुभम पाटील आदी उपस्थित होते.


        

No comments