ad headr

Powered by Blogger.

पिंपळगाव थडीचे येथील ग्रामपंचायती स्वच्छतागृह बांधकामात अडथळा आणत महिला संरपंचाचा विनयभंग

दि.१९/१२/२२
भडगाव प्रतिनिधी - सुभाष ठाकरे

भडगाव:- तालुक्यातील पिंपळगाव थडीचे येथील ग्रामपंचायती स्वच्छतागृह बांधकामात अडथळा आणत महिला संरपंचाचा विनयभंग करणाऱ्या फौजीसह दोन जणांवर भडगाव पोलीस स्टेशनला महिला संरपंचाचा विनयभंग व शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                याबाबत पोलीसांकडील माहीती अशी की, तालुक्यातील पिंपळगाव थडीचे येथे गावातील बगीचा परिसरात ग्रामपंचायतचे स्वच्छ भारत योजने अंतर्गत सार्वजनिक स्वच्छता गृहाचे बांधकाम सुरू असताना सदर बांधकामाचे परीक्षण करण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच सौ. रुपाली जयराम पाटील ह्या दिनांक १७ डिसेंबर रोजी सरपंच या नात्याने गेले असता, गावातील रहिवाशी फौजी विजय भरत पाटील व समाधान जुुगराज पाटील हे दारू पिऊन त्या ठिकाणी आले, सदर ठिकाणी काम करत असलेल्या मजुरांना शिविगाळ करून दमदाटी करू लागले. सदरचे बांधकामे आत्ताच्या आत्ता बंद करा म्हणून जोरजोराने बोलू लागले, त्यावेळी सौ.रुपाली पाटील सरपंच या नात्याने फौजी विजय भरत पाटील यांस विचारणा केली असता, त्यांनी अंगावर धाव घेत सौ.रुपाली पाटील यांना अश्लील शिवीगाळ करत, अश्लील भाषेत बोलून त्यांच्या साडीचा पदर फाडून विनयभंग केला. तसेच सौ.रुपाली पाटील यांचे पती जयराम पाटील यांनी विजय भारत पाटील यांच्या तावडीतून त्यांची सुटका करण्यासाठी धावून आले असता, समाधान युवराज पाटील यांनी जयराम पाटील ह्यांना पकडून चपट्या, बुक्यांनी मारहाण केली. यावेळी बांधकाम करणारे गणेश नामदेव सुतार, विष्णू भगवान पाटील यांनी विजय भरत पाटील यांच्या भितीने स्वच्छतागृहाचे बांधकाम बंद केले. तेव्हा गावातील रहिवासी अभिमान रामचंद पाटील यांनी भांडण सोडून मध्यस्थी केली.
दारूच्या नशेत येवुन शासकीय कामात अडथळा आणणे, महिला सरपंच यांचा विनयभंग तसेच संरपंचांच्या पतीस जिवे मारण्याची दिलेली धमकी याबाबत महिला संरपंच सौ. रुपाली जयराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजी विजय भरत पाटील, समाधान जुगराज पाटील यांच्या विरोधात पो. स्टेला भांदवी कलम ३५४, ३५४ (अ), ३५३, २९४, ३२३, ५०४, ५०६, ५१० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर याच्या मार्गदर्शन खाली पो. हे.काॅ. तात्याबा नागरे करीत आहे.

No comments