ad headr

Powered by Blogger.

गरजवंतांची मदत करत श्री.दिनेश बुटवानी ह्यांनी ठेवला समाजासमोर नवा आदर्श




काल आंबेडकर नगर मध्ये श्रीमती लताबाई बाविस्कर व प्रमिला सपकाळे यांचे घर आग लागून बेचिराख झाले होते. अशा वेळेस समाजसेवक श्री दिनेश उर्फ बंटी बूटवानी गायत्री नगर यांनी एक महिन्याचे रेशन उपलब्ध करून दिले.

तसेच अंकुश बाविस्कर यांचे पोलीस भरतीचे कागदपत्र जळून खाक झाले होते.याबाबत देखील त्यांनी त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले.त्याचबरोबर बाविस्कर आणि सपकाळे कुटुंबांना खाजगी नोकरी लावून देण्याचे देखील त्यांना आश्वासन दिलेले आहे.
आज समाजामध्ये आपण आणि आपले कुटुंब यापुरताच मर्यादित राहण्याचा प्रयत्न करतो, परंतु दिनेश बुटवानी यांनी कृत्याला छेद दिलेला असून त्यांचं समाजामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments