साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मार्फत थेट कर्ज योजना
दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असलेल्या मातंग समाजातील व तत्सम 12 पोट जातीतील जीवनमान उंचविणे, त्यांना समाज प्रवाहात मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी मदत व्हावी याकरिता महाराष्ट्र शासनाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची स्थापना केली आहे.
या महामंडळामार्फत मातंग समाजात अंतर्भाव असणाऱ्या मांग, मातंग ,मिनी मादीग,मादिंग ,दानखणी मांग,मांग महाशी,मदारी,राधे मांग,मांग गारुडी,मांग गारोडी, मादगी,मादिगा या १२ पोट जातीतील व्यक्तींना अर्थसहाय्य करण्यात येते. या महामंडळास २०२२–२०२३ या आर्थिक वर्षाकरिता जिल्ह्यासाठी थेट कर्ज योजनेचे १५ लाभार्थींचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. तरी पात्र व्यक्तींनी अर्ज करण्याच्या आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. या थेट कर्ज योजनेचे अर्ज स्वीकारण्याची मुदत २८ नोव्हेंबर २० डिसेंबर २०२२ पर्यंत कार्यालयीन वेळेत स्वीकारले जातील.
जिल्हा कार्यालयास दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा जास्त कर्ज प्रकरणे प्राप्त झाल्यास लाभार्थींची निवड लॉटरी पद्धतीने शासन आदेशानुसार समितीमार्फत करण्यात येईल. समाजातील होतकरू महिला, पुरुष, प्रशिक्षित लाभार्थींनी या योजनेचा फायदा करून घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. जळगाव. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे संपर्क साधण्याचे आवाहन ताराचंद कसबे, जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
Post a Comment