भडगांव शहरातील ४७ वर्षीय विवाहितेने अतिप्रसंगाला विरोध करताच विवाहितेला पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न;भडगाव पोलिसात गुन्हा दाखल
भडगाव प्रतिनिधी - भरत चव्हाण
भडगाव- अतिप्रसंगाला विरोध करणाऱ्या विवाहितेला पेटवून अज्ञात व्यक्तीने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना दि. २३ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी भडगाव पोलिसात एका ५० वर्षीय अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहरातील ओम शांती केंद्राच्या मागे एक ५० वर्षीय अनोळखी पुरुषाने ४७ वर्षीय पिडीत विवाहितेचा हात पकडून अश्लिल संवाद करत पिडीतेच्या मनास
लज्जा उत्पन्न होईल,असे कृत्य केले.तसेच यानंतर त्याने पिडीतेवर अतिप्रसंग केला. पिडीत महिलेने विरोध करताच आग पेटीने पेटवून देत जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अंगात चॉकलेटी तपकिरी रंगाचा शर्ट, हिरवट पँट, पायात बूट,बारीक दाढी अशा
वर्णनाच्या ५० वर्षीय अज्ञात व्यक्ती विरुद्ध भडगांव पो.स्टे गु.र.नं. ३३०/२०२२ अन्वये भादवी कलम ३०७,३५४,३५४(अ)३२३ ५१० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर हे करीत आहेत. दरम्यान,पिडीत महिलेला उपचारासाठी जळगाव येथून औरंगाबाद येथे हलवल्याचे कळते.घटनास्थळी जळगांव पोलिस अधिक्षक एम राजकुमार, अप्पर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे,सहाय्यक पोलिस अधिक्षक अभय देशमुख,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक किसनराव पाटील,भडगांव पोलिस निरिक्षक अशोक उतेकर, तपास अधिकारी चंद्रसेन पालकर व जळगांव फॉरेन्सीक टिम आदीनी भेट देऊन पाहणी केली.

Post a Comment