भडगांव तालुक्यातील बात्सर येथील शेतातील पत्री शेड मधुन ९५००० हजार किमंतीचा कापुस चोरी;अज्ञात चोरट्यांविरोधात भडगांव पोलिसात गुन्हा दाखल.
भडगांव प्रतिनिधी: तालुक्यातील बात्सर ते पिचर्डे डाबरी रोडलगत असलेले शेत गट नं २६८ मधील बापु रोहिदास जावरे यांच्या मालकिच्या शेतातुन आज दि.१८ रोजी ९५००० हजार रुपये किमंतीचा १५ क्विंटल कापुस चोरी गेल्याची घटना घडली आहे. याबाबत भडगांव पोलिसात अज्ञात आरोपी विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दि. १७ रोजीच्या रात्री ८ वाजेपासून ते दि. १८ रोजीच्या सकाळी ५ वाजेला पावेतो बात्सर ते पिचर्डे जाणाऱ्या डांबरी रोड लगत गट नं. २६८ मधुन बापु रोहिदास जावरे यांच्या मालकिच्या शेतातील पत्रीशेड मधुन कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी ९५००० हजार रुपये किमंतीचा १५ किट्टल कापुस फियार्दी यांच्या शेतातातील पत्री शेडचे शटरला लावलेले कुलुप तोडून आत प्रवेश करून शेड मधील १५ किट्टल कापुस फिर्यादीच्या संमती वाचुन लबाडीच्या इराध्याने चोरून नेला. म्हणुन फिर्यादी-बापु रोहिदास जावरे यांच्या फिर्यादीवरून भडगांव पो.स्टे गुरनं ३२०/ २०२२ अन्वये भादवी कलम ३८०,४६१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मागदर्शना खाली पो.ना. निलेश ब्राम्हणकर हे करीत आहे.
प्रतिनिधी - भरत चव्हाण
Post a Comment