ad headr

Powered by Blogger.

आमडदे येथे विविध कार्यकारी सोसायटीत चेअरमन,व्हाइस चेअरमन यांची निवड..

आमडदे ता.भडगाव - आमडदे येथे विविध कार्यकारी सोसायटीत जळगांव जिल्हा बँक संचालक प्रतापराव हरी पाटील यांच्या सहकार पॅनलच्या 13 च्या 13 जागांवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले होते. संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमन पदी प्रतापराव हरी पाटील व व्हा. चेअरमन पदी नितीन दत्तात्रय भोसले यांची निवड करण्यात आली. सूचक म्हणून शामकांत अशोक भोसले तर अनुमोदन दिपक धर्मराज भोसले यांनी केले.निवडणूक अधिकारी म्हणून भूषण बारी हे होते.सदर निवडी प्रसंगी माजी चेअरमन धर्मराज भोसले, सरपंच संजय पाटील, माजी नगराध्यक्ष शामकांत भोसले, तुषार भोसले, डॉ नरेंद्र भोसले, डॉ तुकाराम भोसले ,किशोर पाटील, शंकर पाटील,हरिश भोसले व संपूर्ण संचालक मंडळ उपस्थित होते.सदर प्रसंगी संस्थेचे संचालक दिपक भोसले यांनी सर्व उपस्थितांना धन्यवाद देऊन आभार मानले.



                                   प्रतिनिधी - नरेंद्र भोसले

No comments