ad headr

Powered by Blogger.

सून-सासू-आजलसासू तिन्ही जण एकाच वेळी महत्त्वाच्या पदांवर, आमडदे येथे राजकारणात महिलांचा गौरव.


आमडदे ता.भडगाव-जळगाव जिल्ह्यातील राजकीय राजधानी म्हणून आमडदे गावाचा उल्लेख केला जातो. मोठमोठ्या राजकारण्यांचा उदय आमडदे या गावात  झालेला आहे. त्यात कै भीमराव गोविंदराव भोसले माजी जि प सदस्य ,कै हिंमतराव गोविंदराव भोसले माजी जि प सदस्य व माजी सरपंच संजयराव भास्करराव भोसले यांच्या कुटुंबातील तिन्ही महिला गावातील प्रमुख पदांवर नियुक्त झालेल्या आहेत.राजकारणाची धुरा या कुटुंबातील महिलांकडे गेलेली आहे. सून सपना तुषार भोसले आमडदे गावातील पोलीस पाटील या पदावर कार्यरत आहेत. सासू कल्पनाताई संजयराव भोसले यांची विद्यमान सरपंच पदी निवड करण्यात आली.आजलसासू जीजाबाई भास्करराव भोसले जिजाई दूध उत्पादक सोसायटीच्या अध्यक्षा आहेत असा हा दुग्धशर्करा योग एकाच कुटुंबातील महिलांकडे आमडदे गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच पहावयास मिळत आहे.
       सदर निवडी प्रसंगी जळगाव जिल्हा बँकेचे संचालक व माजी सरपंच प्रतापराव हरी पाटील,डॉ पुनमताई प्रशांतराव पाटील, प्रशांतराव विनायकराव पाटील, भडगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष शामकांत अशोक भोसले ,माजी सरपंच संजयराव भास्करराव भोसले, माजी सरपंच शेखर शिवाजी भोसले ,माजी सरपंच नरेंद्र मोरेश्वर भोसले व सर्व सन्माननीय ग्रामपंचायतीचे सदस्य यांची उपस्थिती होती.


                                  प्रतिनिधी - नरेंद्र भोसले

No comments