पो. कॉ.शरद पाटील यांना पोलीस महासंचालक पदक बहाल.
पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई. श्री रजनीश शेठ यांनी महाराष्ट्र पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आठशे पोलीस अधिकारी कर्मचारी यांना महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर केले. त्यात अमळनेर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल शरद पाटील यांचा समावेश असून जळगाव येथील पोलीस कवायत मैदानावर महाराष्ट्र दिनाच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सदर प्रसंगी जिल्हाधिकारी श्री अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक श्री प्रवीण मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. शरद पाटील हे अमळनेर पोलीस स्टेशनला पाच वर्षापासून कार्यरत असून त्यांनी आपल्या जनसंपर्काच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अनेक योजना राबविल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी चोरी, जबरी चोरी खून, दरोडा यासारख्या गंभीर गुन्हे उघडकीस आणणे कामी त्याची मोलाची कामगिरी पार पाडली आहे. त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण अमळनेर तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहे.
Post a Comment