ग्रामीण रुग्णालय यावल येथे भव्य आरोग्य मेळावा संपन्न
यावल-स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग व ग्रामीण रुग्णालय, यावल यांच्यातर्फे भव्य मोफत महाआरोग्य मेळावा संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.कुंदन फेगडे तर प्रमुख पाहुणे म्हणून निलेश गढे आणि नगरसेवक दिलीप वाणी, डॉ.प्रशांत जावळे, डॉ.निलेश दुसाने, डॉ. कमलेश पाटील, डॉ. स्नेहा जावळे, डॉ. गौरव धांडे, डॉ. भिरुड, डॉ. खाचणे, डॉ. धीरज चौधरी, डॉ. भटकर रेड क्रॉस सोसायटी तर्फे डॉ. सोनवणे उपस्थित होते.
डॉ. कुंदन फेगडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी 302 लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली, हृदय रोग 20, बाल रोग 26, स्त्रीरोग 49, कान नाक घसा 10, दंतरोग 5, नेत्ररोग 54, अस्थीरोग 23, इतर रुग्णांची तपासणी करण्यात आली आठ रक्तदात्यांनी स्वच्छेने रक्तदान केले, 44 रुग्णांची रक्त व लघवी तपासणी करण्यात आली, एक्स-रे 10 जणांचे घेण्यात आले, 3 रुग्णांचे मृत्यूनंतरचे नेत्रदान फॉर्म भरून घेण्यात आले, शिबिरात 22 मोतिबिंदू रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली, सूत्रसंचालन नरेंद्र तायडे यांनी केले, शेवटी आभार प्रदर्शन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंतभाऊराव बऱ्हाटे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अधीक्षक डॉ. बी.बी.- बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. शुभम तिडके, आरबीएसके टीम चे सर्व डॉक्टर व आरोग्य सेविका औषध निर्माता तसेच ग्रामीण रुग्णालयाचे सहाय्यक अधीक्षक सुधाकर चोपडे, कनिष्ठ लिपिक देवेंद्र जवरे, राजेंद्र झोपे व मुख्य परिचारिका जोस्ना निंबाळकर, औषधनिर्माण अधिकारी विजयकुमार वाढे, रक्त तपासणी विभाग श्री नानासाहेब घोडके, क्ष-किरण विभाग श्री उध्व कोरडे, मलेरिया विभागाचे रहेमान तडवी, कुष्ठरोग विभागाच्या कु.अश्विनी जाधव, नेत्रचिकित्सा अधिकारी युवराज ठोंबरे, रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी तसेच आशा कर्मचारी व गटप्रवर्तक आय. इ. सी. चे सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
Post a Comment