ad headr

Powered by Blogger.

कोरोनाचा विषाणू तर गेला पण; महागाईच्या विषाणूचे काय? - मुकुंद सपकाळे

 
राज्य शासनाने महाराष्ट्रातील कोरोना  बाबतीत पूर्णपणे निर्बंध हटवले आहेत. म्हणजे कोरोनाचा विषाणू गेल्यात जमा आहे. त्यामुळे शासनासह सर्व जनतेने देखील सुटकेचा श्वास सोडला आहे. परंतु जी सर्वसामान्य जनता आहे, ज्याचं हातावरचं पोट आहे. अगोदरही त्यांना कोरोना बद्दल काही देणंघेणं नव्हतं आणि आताही नाही. कारण त्यांना पक्कं माहित आहे, की आपण आज काम केलं तर रात्री आपली चूल पटेल आणि आपल्या मुलाबाळांचा भुकेचा दाह शांत होईल. म्हणूनच कोरोणाचे निर्बंध असले काय किंवा नसले काय.

 परंतु ज्या विषाणूची भीती देशातील प्रत्येक नागरिकाला भेडसावत आहे, तो विषाणू म्हणजे "महागाईचा विषाणू" दिवसेंदिवस अजस्र रूप धारण करून येथील माणसांच्या मानगुटीवर बसून "मृत्यूफास" आवळतोय. हा विषाणू दिवसेंदिवस वाढत गेला, तर कोरोनापेक्षाही महाभयंकर परिस्थिती या देशात निर्माण होऊन अराजकता माजेल्याशिवाय राहणार नाही.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींनी तत्कालीन  तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका करताना म्हणत असत की,  "इस देश का प्रधानमंत्री  महेंगाईका "म" बोलने के लिए तयार नही है." त्या वेळेत जनतेला असं वाटत होतं की, नरेंद्र मोदी नक्कीच महागाईवर नियंत्रण आणतील. या देशातील सर्वसामान्य जनतेला "अच्छे दिन" येतील पण सात वर्ष लोटली गेली तरी अच्छे दिन तर सोडाच पण महागाईच्या  "म" ने येथील जनता अक्षरशः "म"रणयातना भोगत आहे. 


आज पेट्रोलचे दर ६५ रुपयांवरून १२२ रुपये झालेले आहेत. देशातील चार राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यावर पेट्रोल १०० रुपये होते आणि निवडणुका संपल्याबरोबर पेट्रोलचे भाव एकशे बावीस रुपये झाले नरेंद्र मोदींच्या एकंदरीत कार्यशैली वरून असेच दिसून येते की, जनतेच्या मूळसमस्ये बद्दल त्यांना काही देणेघेणे नाही. त्यांना फक्त आसुरी राजकारण करून निवडणुका जिंकून "हुकूमशाही" "हिटलरशाही" या देशात जन्माला घालायची आहे. 
एक वेळ कोरोनाचा विषाणू परवडला त्याने गरीब-श्रीमंत असा भेदभाव केला नाही, त्याची लाट काही दिवस येते तशी निघूनही जाते पण "महागाईच्या विषाणूची" लाट ओसरायला तयार नाही.त्याच्या काटेरी डंखानी  येथील सर्वसामान्य जनता अक्षरशः रक्तबंबाळ होत आहे, त्या जमिनीवर सांडलेल्या रक्ताच्या थेंबाथेंबातून दाही दिशातून आवाज घुमत आहे, की "कुठे गेले अच्छे दिन, कुठे आहेत आमचे १५लाख, कुठे आहेत आमच्या मुलांच्या नोकऱ्या, पण पाषाणहृदयी प्रधानमंत्र्यांना त्या आक्रोशाशी काही देणेघेणे नाही. निवडणुकीच्या  विजय उत्सवामध्ये इतक मश्गूल झालेले आहेत, की त्यांच्या कानापर्यंत पोचत नाही. 
याअगोदर इंधन दरात एक रुपयाने जरी वाढ झाली तरी, येथील विरोधी पक्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत गोंधळ घालायचे पण आता तसे चित्र दिसत नाही. यामुळे विरोधी पक्ष सरकारच्या धोरणात सामील आहे की काय? असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही.

 कोरोणाच्या महामारी मुळे आधीच संकटात सापडलेल्या सर्वसामान्य जनतेला महागाईच्या लाटेने तडाखे द्यायला सुरुवात केली आहे. चौखूर उधळलेल्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून गरिबांचे जगणे कठीण झाले आहे २०१४पूर्वी घरगुती गॅस ४१० रुपयाला मिळायचा आता तोच गॅस साडेनऊशे रुपयाला मिळत आहे. त्याचबरोबर डाळी,तेल,मसाले आणि भाज्यांची किंमत दुप्पट झाली आहे. पाम तेल ६५ रुपयावरून १४५ रुपये झाले आहे. कामधंद्यासाठी बाहेर प्रवास करायचा तर डिझेल पेट्रोल शंभरी पार करून द्वीशतकाकडे वाटचाल करीत आहे. रेल्वेचे तिकीट दर वाढले आहे. एसटी बस बंद आहे. खाजगी वाहतूक सर्वसामान्यांना परवडत नाही. त्यामुळे महागाईचा "म" तर सोडाच येथील सामान्य जनता जिवंतपणी "म"रणयातना भोगत आहे. अशा वेळी पालक म्हणून उत्तरदायित्व असलेल्या केंद्र सरकारने जनतेची महागाईच्या दुष्टचक्रातून सुटका करावायास पाहिजे पण वेगवेगळ्या प्रकारची दरवाढ करून केंद्र सरकार जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. केंद्रात असलेला भाजपा सरकारने २०१४ च्या निवडणूक प्रचारात म्हणत होते, की "बच्चा रोता है तो माॅं आसू  पिकर सोती है."  "मतदान करायला जाल तर घरी असलेल्या ग्यास सिलेंडरला नमस्कार करून जा." अशी बोलघेवडी भाषणबाजी २०१४ सली केल्यामुळे लोकांनी  मोदींच्या भूलथापांना बळी पडून  मोदींना दिल्लीच्या तख्तावर बसवले. पण आता तेच मोदी प्रचंड वाढत्या महागाईवर बोलायला तयार नाही. त्यांना काहीही करून संपूर्ण देशात एक हाती सत्तेच्या सिंहासनावर बसायचं आहे. मग त्यासाठी माणसांच्या प्रेतांचा पूल बांधावा लागला तरी चालेल. पण मोदींना हे माहीत नाही, की ज्या दिवशी येथील सामान्य जनतेचा संयम सुटेल त्या दिवशी या महागाईने रोद्ररूप धारण केलेल्या अग्निकुंडात मोदींसोबत भाजपा, आर एस एस च्या महत्त्वाकांक्षेचा बळी दिल्याशिवाय राहणार नाही.


                       मुकूंद सपकाळे
             अध्यक्ष महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा
                     ९८२२९५८७९१

No comments