ad headr

Powered by Blogger.

भडगावला वाळूचे ट्रॅक्टर उलटल्याने तीघांचा मृत्यू..


भडगाव - गिरणा पात्रातून भरलेले वाळू उपसा करण्यासाठी घेऊन जात असताना, बुधवारी रात्री ११ वाजता ट्रॅक्टर उलटून तीन जण ट्रॅक्टर खाली दाबले गेल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
बुधवार दिनांक 18 रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास वाळू घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला भडगाव ते वडदे दरम्यान अपघात झाला, ट्रॅक्टर उलटल्याने ट्रॅक्टरखाली येऊन तीन जण दगावले यात सुरेश अशोक शिंदे (वय 27) रा. टोणगाव, रविन सुरेश शिंदे (वय 25), मयुर भाई (वय 21) रा.आधार चौक, भडगाव यांचा समावेश आहे, त्यांना भडगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता मृत घोषित करण्यात आले या घटनेबाबत पोलीसात उशिरापर्यंत नोंद नव्हती, या घटनेत तीन जण जखमी असून ते खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

                 
              
  भडगाव प्रतिनिधी - सुभाष ठाकरे

No comments