कन्येला जन्म दिल्यानंतर विवाहितेचा मृत्यू कुटुंबात मुलीच्या लग्नानंतर सुनेच्या मृत्यूने शोककळा!!!
||निधन वार्ता||
भडगाव -आमडदे ता.भडगाव येथील प्रगतिशील शेतकरी मनोज धनराज भोसले व राहुल धनराज भोसले यांची सून व इंजिनिअर तुषार मनोज भोसले यांची पत्नी सोनल तुषार भोसले (वय 20)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
भडगाव -आमडदे ता.भडगाव येथील प्रगतिशील शेतकरी मनोज धनराज भोसले व राहुल धनराज भोसले यांची सून व इंजिनिअर तुषार मनोज भोसले यांची पत्नी सोनल तुषार भोसले (वय 20)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
पिंप्री हाट ता भडगाव येथील संजय विनायक सोनवणे यांची कन्या सोनल व आमडदे येथील मनोज धनराज भोसले यांचे चिरंजीव इंजिनिअर तुषार यांचा विवाह 12 मार्च 2020 रोजी दोन वर्षेपूर्वीच संपन्न झाला होता.दोघांच्या सुखी संसारात लवकरच गोंडस बाळाचे आगमन होणार होते.कुटुंबात सर्व कुशल मंगल होते,मागच्याच आठवड्यात सोनल ने नणंद च्या लग्नातील सर्व सोपस्कार पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका घेतली होती. कुटुंबात सोनल ही प्रत्येकाची आवडती होती,ती सून नसून मुलगीच होती,सोनलही सर्वांची काळजी घेत होती.सोनलचे प्रसूतीदरम्यान सीझर झाल्यानंतर एका गोंडस कन्येला जन्म दिला,मात्र त्यानंतर सोनल ची तब्बेत खालावली. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र सोनलला वाचविण्यात यश आले नाही.
12 मार्च 2022 रोजीच सोनल वर काळाने घाला घातला आणि तिची प्राणज्योत मालविली. लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच सोनल ची प्राणज्योत मालवली आणि तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली.मागच्या आठवड्यात मनोज धनराज भोसले यांच्या कन्येचे लग्न होते,कुटुंबात लग्न व त्यानंतर लहान बाळाचे आगमन होणार होते,संपूर्ण भोसले कुटुंब आनंदात होते.आजी आजोबा लहान बाळाच्या आगमनाची तयारी करत होते.मात्र कोणाच्या ध्यानी मनी नसतांना काळाने या सुखी परिवारावर घाला घातला आणि जे व्हायला नको ते झाले.सोनलच्या अवेळी जाण्याने संपूर्ण कुटुंब मानसिक धक्क्यात आहे.या घटनेने संपूर्ण गाव सुन्न झाले होते.संपूर्ण गावात व परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
सोनल च्या पश्चात गोंडस कन्या,पती,सासू-सासरे,नणंद,आई-वडील,भाऊ-बहीण असा मोठा परिवार आहे.

Post a Comment