ad headr

Powered by Blogger.

शेतकऱ्यांच्या आत्महत्येची वाट बघत आहात का? पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांची व्यथा..!


पाचोरा- पाचोरा तालुक्यातील नाचणखेडे गावाच्या शेत शिवार गट नंबर ७६ आणि ७७ च्या बांधावर डीपी आहे, ती १७ तारखेला जळाली.शेतकरी अर्ज विनंती करून देखील कुणी दखल घेत नाहीत. उलट बील भरा तेव्हा डीपी बसवू म्हणतात. या शेतकऱ्यांनी ७८हजार रुपये बील भरले आहे. मागील वर्षी डीपी जळाली होती तेव्हा शेतकऱ्यांनी ६० हजार जमा केले,ही डीपी बसवली व तीही पुन्हा जळाली. कोठून आणायचे पुन्हा पुन्हा पैसे? डीपी जळाली, बंद पडली तर ४८ तासात बसवणे आवश्यक आहे. कारण काय?डीपी नाही का? स्टॉक नाही का?पैसे पाहिजे का? सगळं तर उपलब्ध आहे.मग,अडचण कसली?प्रधानमंत्री मोदीजी म्हणतात त्याप्रमाणे आत्मनिर्भर भारतात डीपी तर बनली पाहिजे,कि चीन मधून आणावी लागेल ? माहीजी ,सारंगखेडा च्या यात्रेत डीपी मिळाली असती तर शेतकरी घेऊन आले असते.
     पाचोरा तालुक्यातील नाचणखेडा शिवारात डीपी जळाल्याने पीक जळते आहे. शेतकरी आत्महत्या करतील आणि मुख्यमंत्री येऊन सान्त्वन व भाषण करतील का? हे गाव मुख्यमंत्र्यांचे आमदार मा.किशोर पाटील यांच्या मतदारसंघात आहे.
येथे डीपी बसवण्यासाठी पाचोरा जागृत जनमंच चे अध्यक्ष श्री निलकंठ पाटील आणि उपाध्यक्ष श्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन व उपोषण चालू आहे ते ही जंगलात. जेथे समस्या तेथेच बोंबाबोंब .
      महाराष्ट्र जागृत जनमंच ने नाचणखेडे येथे भेट दिली. शेतकऱ्यांनी विदारक चित्र समोर मांडले. महिला शेतकरी सुद्धा जंगलात उपोषणाला बसल्या आहेत आणि आपले हे महाआघाडी सरकार चे मंत्री कोकणात रिसोर्ट घेत आहेत.तरीही मुख्यमंत्री म्हणतात, आपला महाराष्ट्र, आपले सरकार.महाराष्ट्र आपला आहे पण सरकार आपले नाही.अशी भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण होताना दिसत आहे

शिवराम पाटील.
9270963122.
महाराष्ट्र जागृत जनमंच


                            प्रतिनिधी - सुभाष ठाकरे

No comments