अमळनेर पोलीस स्टेशन कडून शहरातील रात्रगस्तीसाठी पोलीसांना मदत म्हणून पोलीस-मित्र सोबत घेण्याची संकल्पना राबवण्यात येणार......
अमळनेर- पोलीस स्टेशन कडून अमळनेर शहरातील रात्रगस्तीसाठी पोलीसांना मदत म्हणून पोलीस-मित्र सोबत घेण्याची संकल्पना राबवण्यात येणार आहे. यामध्ये शहराच्या चारही दिशेस रात्री १२.०० ते सकाळी ०५.०० पर्यंत ४-४ पोलीसमित्र जागणार आहेत.
तरी यासाठी २० ते ५० वयोगटातील इच्छुकांनी पो.स्टेशनला स.पो.नि. परदेशी, पो.उप.नि. शत्रुघ्न पाटील, पो.उप.नि. गंभीर शिंदे, पो.उप.नि. नरसिंह वाघ, पो.उप.नि. भुसारी, गोपनीय विभाग तसेच शहरातील झामी चौकी, गांधलीपुरा चौकी येथील पोलीस अंमलदार वा कोणतेही इतर पोलीस अंमलदार यांचेशी संपर्क साधावा… पोलीस मित्र नोंदणी दिनांक १४/०३/२२ ते २४/०३/२२ राहील.

Post a Comment