ad headr

Powered by Blogger.

🔴कथाकार महाराज यांनी संविधानाच्या बाबतीत अकलेचे तारे तोडले.,. 🔴संविधान प्रेमींच्या विरोधाने ,कथाकाराला माफीनामा दिल्यानंतर सोडले..

अंमळनेर (प्रतिनिधी)जागृत हनुमान मित्र मंडळ तांबेपुरा आयोजित श्रीराम कथा सप्ताह सुरू असून पहिल्याच दिवशी श्रीराम कथा कार यांनी संविधानाच्या विरोधात गरड ओकली व संविधान मुळे जाती जाती एक न होता विखुरल्या गेल्या असे बिन बुडाचे विधान केले. तसेच वर्णव्यवस्थेमध्ये असलेल्या ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य आणि शूद्र असे चार वर्ण अधोरेखित केले. याचाच अर्थ संविधानाला न जुमानता वैयक्तिक त्यांच्या उच्च ,नीच विचारसरणीला दुजोरा दिला. याचाच अर्थ हा संविधान द्रोह आहे. अशा त्याच्या अभिभाषणामध्ये उल्लेखित केले आहे म्हणून अंमळनेर शहरातील संविधान प्रेमींनी याविषयी पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली व या कथाकाराला बोललेल्या विधानाच्या बद्दल माफीनामा द्यायला भाग पाडले. कारण अशा अर्धशिक्षित कथाकारामुळे समाज व्यवस्था दूषित होण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती . त्या अनुषंगाने त्यांच्या वर पाय बंद घालून पुन्हा संविधानाविषयी ब्रशब्द काढणार नाही असे, वचन घेऊन त्यांना माफ केले. पुढील कार्यक्रम सुरू ठेवण्याचे परवानगी दिली. त्यांच्या या विधानाच्या विपर्यास म्हणून जळगाव धुळे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आंदोलने आणि मोर्चे निघाले. अनेक ठिकाणी रास्ता रोको झाला. कथाकार झा माफीनामा दिल्यानंतर सर्व दूर शांतता झाली.

No comments