गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर झळाळला श्री संत सेना महाराज मंदिराचा कळस.
भडगाव:- दि. 19 [ प्रतिनिधी ].सुभाष ठाकरे. येथील श्री. सत सेना महाराज नाभिक समाज मडळाचे श्री विठ्ठल-रुक्मिणी व श्री संत सेना महाराज मंदिराचा कळस काळपट झाल्यामुळे त्याला नवीन झळाळी देण्यासाठी पॉलिश करण्यात आले. आज गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभ मुहूर्तावर अत्यंत भक्तिमय वातावरणात हा कळस आणि झेंडा पुन्हा एकदा मंदिरावर विधिवत बसविण्यात आला.
कळस चढविणे हे अत्यंत जोखमीचे व कठीण काम होते, परंतु भडगावचे सुपुत्र पुरुषोत्तमभाऊ गुरव यांनी नेहमीप्रमाणे या कार्यात मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या या अनमोल योगदानामुळे हे कार्य सुलभ झाले. याप्रसंगी नाभिक समाज विकास मंडळाचे अध्यक्ष संजय पवार(पत्रकार ), कार्यकारी सदस्य सुभाष ठाकरे आणि राकेश शिरसाट, निलेश गुरव यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
Post a Comment