ad headr

Powered by Blogger.

गुढी पाडव्या निमित्त चैत्र पालवी स्वरोत्सव मैफिल

चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढी पाडवा. साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त. नवीन मराठी वर्षाचा प्रारंभ दिन. या मंगल दिनाचे स्वागत *स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या* वतीने प्रात:कालीन सुगम संगीताच्या मैफिलींचे अर्थात *चैत्र पालवी स्वरोत्सवाने* करणार आहोत. 
हा कार्यक्रम *गुरुवार दि. १९ मार्च रोजी सकाळी ठीक ६ वाजता महात्मा गांधी उद्यानात* संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास *भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन* चे सहकार्य लाभले आहे. 
कार्यक्रमासाठी आमदार श्री. राजुमामा भोळे, शहराच्या प्रथम नागरिक सौ. दिपमाला काळे जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे व जैन इरिगेशन सिस्टिम्स चे अध्यक्ष श्री. अशोकभाऊ जैन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 
या स्वरोत्सवात सौ. श्रुती जोशी श्री. वरुण नेवे, कु. राजेश्वरी रत्नपारखी (बासरी) आपली कला सादर करणार आहेत तर श्री. राजेंद्र माने संवादीवर व श्री. राहुल कासार तबल्यावर संगत करणार आहे. या प्रात:कालीन मैफिलीचे निवेदन सौ. प्रिती झारे करणार आहेत.
सर्व तमाम मराठी रसिकांना या सुगमांगीतच्या मैफिलीचे सुरेल आमंत्रण असून आपल्याच शहरातील कलावंत हा स्वरोत्सव सादर करणार असून आपला गुढी पाडवा मंगलमय करणार आहेत. तरी आपण सर्व रसिकांनी या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन कलावंतांना प्रोत्साहित करावे असे आवाहन चांदोरकर प्रतिष्ठान व भवरलाल व कांताबाई जैन फाऊंडेशन च्या वतीने करण्यात आलेले आहे.

No comments