🛑 महाशिवरात्रीनिमित्त सिद्धेश्वर महादेव मंदिर साने नगर येथे सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह व बारा गाडे ओढण्याचा चा कार्यक्रम संपन्न होणार..
अमळनेर( प्रतिनिधी)किरण लोखंडे. साने नगर येथील सोन्याचा महादेव म्हणून परिचित असलेल्या सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त दर वर्षाप्रमाणे विविध कार्यक्रम होत असतात. आबाल वृद्धांच्या उत्साहाला पारावार नसतो. ११ फेब्रुवारी ते,१९ फेब्रुवारी पर्यंत अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहा चे आयोजन आहे. अनेक सुप्रसिद्ध कीर्तनकार सात दिवस त्यांच्या अमोघ वाणीने पंचक्रोशीतील रहिवाशांना मंत्रमुग्ध करून ज्ञानार्जन करतात. त्या अनुषंगाने लहान मुलांना, महिलांना, विद्यार्थ्यांना वरिष्ठ नागरिकांना अध्यात्मिक धडे दिले जातात. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी पालखी मिरवणूक साने नगर, न्यू प्लॉट, तांबेपुरा परिसर येथे निघते. बोरी नदीच्या तीरावर पश्चिमेला सोन्याच्या महादेव मंदिर स्थापनेला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत असून त्या निमित्ताने पंचक्रोशीत आनंदोत्सव साजरा होणार आहे.
सालाबादप्रमाणे बारा गाडी ओढण्याचा कार्यक्रम भक्ती भावाच्या वातावरणात संपन्न होणार आहे .त्यानिमित्ताने पंचक्रोशीतील व तालुक्यातील नागरिकांनी सिद्धेश्वर महादेव मंदिर यात्रा सहभाग सहभागी होण्यासाठी, तथा महादेव मंदिराच्या दर्शनासाठी आवर्जून उपस्थित रहावे ,अशे सिद्धेश्वर महादेव संस्थानाकडून जाहीर आव्हान करण्यात आलेले आहे.
Post a Comment