महाशिवरात्री निमित्त श्रीक्षेत्र ममलेश्वर महादेव मंदीर संस्थान, झाडी ता. अमळनेर येथे दि.१४/२/२०२६ ते दि.१७।२।२०२६ भव्य यात्रोत्सव.
लगभग 300 वर्षापुर्वीचे पुरातन जागृत देवस्थान श्रीक्षेत्र ममलेश्वर महादेव मंदीर संस्थान, झाडी ता. अमळनेर येथे महाशिवरात्री यात्रोत्सव होणार आहे. तरी सर्व शिवभक्तांनी यात्रेत येऊन श्री ममलेश्वर महादेव दर्शनाचा लाभ घ्यावा.असे आवाहन मंदिर विश्वस्तांनी केले आहे. आणि यात्रेत विविध प्रकारची दुकाने, हॉटेल्स, लहान मोठयांसाठी पालखी, झुले, इ. मनोरंजन असणार आहे. तसेच या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे राहणार आहे.
यात्रोत्सव दि.१४ फेब्रुवारी २०२६ शनिवार ते दि.१७ फेब्रुवारी २०२६ मंगळवार रोजी पर्यंत सुरू राहणार आहे. तसेच वि. 13 फेब्रुवारी २०२६ शनिवार रोजी लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होईल. तसेच दि. 15 फेब्रुवारी 2026 रविवार रोजी सकाळी ८ वा. भव्य ध्वज मिरवणूक होळी चौकातून निघणार आहे. ध्यज मिरवणूक हलगी डफ ताशा व न्यू साईराम बैंड च्या तालावर वाजत गाजत देववल्ली परीसरात येईल. तसेच ध्वज मिरवणुकीत खास आकर्षण बॅन्ड पथके येणार आहेत मोठ्या जल्लोषात ममलेश्वर महादेव मंदिरावर ध्वज लावण्यात येईल, तसेच ध्वज लावल्यावर महादेव मंदीरावर अभिषेक करण्यात येईल. दि. १९ फेब्रुवारी २०२६ रविवारी रोजी सुप्रसिध्द किर्तनकार ह.भ.प. स्नेहल दिवी, पळासखेडे, छत्रपती संभाजीनगर यांचे जाहिर किर्तन रात्री ८ वा. होणार आहे. दि.१६ फेब्रुवारी २०२६ सोमवारी रोजी सुप्रसिध्द संपुर्ण खांदेशात व विदर्भात नावाजले किर्तनकार ह.भ.प. शिवा महाराज, बावस्कर, बुलढाणेकर
यांचे जाहिर किर्तन रात्री ८ वा. होणार आहे. तरी सर्व भाविकांनी यात्रेस सहभाग घेऊन देवदर्शन, यात्रा आणि किर्तनाचा लाभ घ्यावा.
Post a Comment