प्रत्येक प्रभागामध्ये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय उभे करणार..शिक्षण सभापती नावेद शेख यांनी दिली माहिती..
अमळनेर दि 28 [ प्रतिनिधी ] नगरपालिकेच्या 383.83 कोटीचा घवघवीत अर्थसंकल्प सादर झाल्याने, नगराध्यक्ष परीक्षीत बाविस्कर यांनी वाचन प्रेमींसाठीम स्वतंत्र तरतूद असेल असे सांगितल्यामुळे अमळनेर मधील बुद्धिजीवी लोकांनी त्यांचे स्वागत केले. शिक्षण सभापती नावेद शेख यांना आमच्या प्रतिनिधीने
विचारल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना उत्तर दिले की प्रत्येक प्रभागांमध्ये वाचनालय आणि ग्रंथालय ची स्थापना ओपन प्लेस मध्ये घेणार आहोत असे अधोरेखित केले. नगरपालिकाच्या नगर प्रशासनाने घेतलेला हा निर्णय अत्यंत सुंदर आणि नवीन पिढीला प्रेरणादायक ठरणार आहे. प्रत्येक प्रभागांमध्ये जर वाचनालय आणि ग्रंथालय झाले तर नवीन विद्यार्थी,
पालक आणि वरिष्ठ नागरिकांना तो एकमेव मोठा दिलासा भेटणार आहे. नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांच्या या बुद्धी कौशल्यामुळे व नागरिकांना देण्यात येणाऱ्या वाचनासाठी सोयीसुविधांमुळे ते खरच दूरदृष्टी असलेले नगराध्यक्ष आहेत असे त्यांनी सिद्ध केले आहे.
नगरपालिकेची संपूर्ण सत्ताधारी व विरोधकांनी त्यांच्या या दूरदृष्टीला(व्हिजन) सहकार्य केले म्हणून नवनिर्वाचित सर्व नगरसेवक यांचे नागरिकांकडून स्वागत आभार आणि अभिनंदन होत आहे. प्रत्येक प्रभागामध्ये वाचनाची कल्पना ही खरच सुंदर आहे आणि ती तडीस नेणे हे सर्व प्रतिनिधी चे आद्य कर्तव्य आहे व त्यामुळे अमळनेरच्या इतिहासात नवीन पान जोडले जाईल ,याची अमळनेर शहरातील नागरिकांचे मत आहे. शिक्षण सभापती नावेद शेख खरोखरच शिक्षण क्षेत्राला शोभेल असे काम करत आहेत त्यामुळे त्यांचं पुनश्या धन्यवाद.
Post a Comment