🔴डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारका समोर अंडी आणि कोंबडी खातात तळलेली...🎯 🔴आंबेडकरी समाजाची अतिक्रमण हटावची मागणी राजकारणापायी धूळ खात पडलेली..🎯
अमळनेर दि 01 ( प्रतिनिधी) गांधीपुरा पोलीस चौकीच्या समोर विश्वभूषण ,विश्वरत्न, विश्ववंदनीय महामानव,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती स्मारक मोठ्या डौलाने उभे आहे. तात्कालीन आमदार माननीय शिरीष चौधरी यांनी महत प्रयासाने स्मारक उभे केले. तालुक्यातील जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची प्रेरणा घेण्यासाठी नेहमी स्मारकासमोर कार्यक्रम आयोजित करतात व नतमस्तक होतात. मोठा चौक असल्यामुळे चौकाचे सुशोभीकरण झाले पाहिजे, तेथील अतिक्रमण हटवून अतिक्रमण धारकांना नगरपालिकेची शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये विस्थापित करून स्थलांतरित करावे. जेणेकरून अतिक्रमण धारकांचा रोजगाराचा प्रश्न मिटेल. त्यांची उपासमार होणार नाही याची जाणीव ठेवून नवीन नगरपालिका प्रशासनाने त्या चौकाला बसलेला अतिक्रमणाचा विळखा काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकपरिसरराचा श्वास मोकळा करावा.
अशी आंबेडकरी समाजाची अनेक वर्षापासून ची मागणी धूळ खात पडलेली आहे. कारण त्या परिसरात अनेक बेकायदेशीर बाबी राजरोसपणे घडतात. त्यामुळे स्मारक परिसराची व आंबेडकरी समाजाची अवहेलना होते. त्या परिसरातील पावित्र्य राखण्यासाठी येथील बेकायदेशीर अतिक्रमण हटवून त्यांना विस्थापित करण्यात यावे. असे सुजाण नागरिकांचे मत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले ,छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,अण्णाभाऊ साठे या महामानवांवर व त्यांच्या विचारांवर चालणारे विचारधारेचे ( चळवळीचे) हजारो कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करतात. त्या सर्व संघटनांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक मुखाने अतिक्रमण हटाव ची मागणी अनेक वर्षापासून सतत केलेली आहे. नगरपालिका प्रशासनाने, पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन ते अतिक्रमण काढावे .
अमळनेर मधील बहुजन समाजाच्या सहनशीलतेचाअंत बघू नये. असे नागरिकांचे मत आहे.
Post a Comment