ad headr

Powered by Blogger.

भडगाव महसूल विभागाचा 'सर्जिकल स्ट्राईक': गिरणा पात्रातील वाळू उपसा करणारी बोट केली उद्ध्वस्त!


​भडगाव:-प्रतिनिधी सुभाष ठाकरे.तालुक्यातील गिरड आणि मांडकी परिसरात गिरणा नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. या धडक मोहिमेत वाळू उपसा करणारी एक बोट आणि वाळू काढण्यासाठी वापरले जाणारे ४ किन्हीचे दोर जाळून नष्ट करण्यात आले आहेत. महसूल विभागाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे वाळू माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून गिरड आणि मांडकी येथील गिरणा नदीपात्रात बोटींच्या आणि किन्हीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज (वाळू) उपसा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. येथुन अवैधरित्या वाळु उपसा करून धुळे, नदुरबार या जिल्ह्यात वाळु रवाना केले जात होते. यापुर्वी केलेल्या कारवाईत हे समोर आले होते. याची गंभीर दखल घेत महसूल विभागाने विशेष पथकाद्वारे धाड टाकली. यावेळी घटनास्थळावर वाळू उपशासाठी वापरली जाणारी बोट प्रशासनाने जाळून नष्ट केली, तसेच चार मोठ्या किन्हीचे दोर कापून जाळण्यात आले.
​ ही धडक कारवाई पथक प्रमुख तथा नायब तहसीलदार रमेश देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात खालील अधिकारी गिरड मंडळ अधिकारी दिनेश येंडे, ग्राम महसूल अधिकारी अनिता सुतार, प्रियांका शिंदे, सुनील मांडोळे, दीपक पाटील, प्रकाश पाटील, महसूल सेवक रामकृष्ण मनोरे आणि अश्विनी लिंडायत.
​पोलीस प्रशासन: पोलीस कॉन्स्टेबल कल्पेश अहिरे, कुंदन राजपूत आणि पोलीस पाटील विनोद मनोरे.
​नागरिकांकडून निर्णयाचे स्वागत
​नदीपात्रातून होणाऱ्या अवैध उपशामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असून भूजल पातळीवरही परिणाम होत होता. महसूल विभागाने घेतलेल्या या कडक भूमिकेचे गिरड आणि मांडकी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. वाळू चोरी पूर्णपणे थांबवण्यासाठी महसूल विभागाने अशाच प्रकारच्या धडक कारवायांचे सत्र भविष्यातही सुरू ठेवावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

No comments