ad headr

Powered by Blogger.

परमपूज्य चैतन्य गोस्वामी महाराज (मॉरिशस )यांच्या उपस्थितीत हरेकृष्ण महोत्सव व पदयात्रेची मिरवणूक

जळगाव दि 01 [ प्रतिनिधी] येथील इस्कॉन मंदिर तर्फे श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू यांच्या वैष्णव परंपरेनुसार आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन ही विश्वव्यापी संस्था श्रीकृष्ण भक्तीचा प्रचार जगभर करीत आहे.त्याचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संन्याशी प्रचारक प. पू. सुंदर चैतन्य गोस्वामी महाराज[ मॉरिशस ] हे आपल्या जळगाव शहरात पदयात्रा प्रवचन व दिव्य हरिनाम संकीर्ण करण्यासाठी येत आहेत. सदर हरिनाम संकीर्तन पदयात्रेचे आयोजन दिनांक0 2/02/ 2026 रोजी दोन ते संध्याकाळी सहा वाजता दरम्यान होणार आहे. पदयात्रेचे मार्ग पुढील प्रमाणे राहील पदयात्रा प्रारंभ बिग बाजार नेहरू चौक जळगाव येथून होईल व पुढे नेहरू चौक, टावर चौक,चित्रा चौक,गणेश कॉलनी, मानराज पार्क, गुजराल पेट्रोल पम्प,पिंप्राळा बाजार पट्टा, व पुढे हरे कृष्ण मंदिर मयूर कॉलनी पिंप्राळा येथे सांगता होईल.
तेथे प.पू.सुंदर चैतन्य गोस्वामी महाराज मॉरिशस यांचे प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेत फक्त हरेकृष्ण हरेकृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे या महामंत्र्याचे गायन करतील एका बैलगाडीवर भगवंताचे विग्रह मूर्ती सजवलेले असतील. भाविकांना हातात प्रसाद वाटप होईल तसेच दिनांक 03/ 02 /2026 व दिनांक 04/ 02/ 2026 रोजी संध्या.6. 00 ते 9.00 वाजे दरम्यान महासत्संगाचे आयोजन पोलीस पद्मालय हॉल पोलीस मुख्यालयाजवळ नवीन बसस्टॅन्ड रोड स्टेडियम शेजारी जळगाव येथे करण्यात आले.आहे यामध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संन्याशी प्रचारक व संकीर्तन सम्राट प. पू. लोकनाथ स्वामी महाराज पंढरपूर यांचे कृपा पात्र शिष्य प.पू. सुंदर चैतन्य गोस्वामी महाराज मॉरिशस हे भद्भगवत व श्रीमद्भागत यातील विषयांवर तरुणांना व इतर उपस्थित सर्व लोकांना विशेष प्रवचन देतील.हरेकृष्ण महोत्सवा मध्ये श्रीकृष्ण कथा  संकीर्तन 56 भोग भगवंताचा अभिषेक आरती झुला दर्शन इत्यादी विशेष आकर्षण राहणार आहे.   महाराज दिव्य हरिनाम संकीर्तन करिता विश्वभरात प्रसिद्ध असून येथे देखील भक्तांसोबत मधुरहरिनाम संकीर्तन होणार आहे. प्रवचनानंतर रात्री सर्व उपस्थित भक्तां करिता श्रीकृष्ण महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी या अध्यात्मिक परवणीचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.सेवा किंवा अधिक माहितीसाठी संपर्क मो. क्र. 9890657240 या क्रमांकावर संपर्क करावा तरी जास्तीत जास्त भाविकांना या अध्यात्मिक परवणीची माहितीच आहे.

No comments